शेळया – मेंढयातील देवी आजारावर वेळीच नियंत्रण हवे !

शेळी – मेंढी पालनात आहार, गोठा व्यवस्थापन प्रजनन आणि आरोग्य व्यवस्थापन या चार बाबी महत्वाच्या आहेत.
sheep - Goat Pox
sheep - Goat PoxAgrowon

डॉ.मिरा साखरे

शेळया-मेंढ्यांना होणारे संसर्गजन्य आजार जसे कि, आंत्रविषार (Enterotoximia), पीपीआर (PPR), लाळया – खुरकुत (FMD), फऱ्या (Black Quarter), घटसर्प (H.S.) याबद्दल पशुपालक जागरूक आहेत. पण त्याचप्रमाणे देवी रोगाच्या प्रादुर्भावाबाबत तितकेच जागरूक असणे आवश्यक आहे.

कारणे व प्रसार :

देवी आजार शेळयामध्ये गोट पॉक्स तर मेंढयामध्ये शीप पॉक्स या विषाणुमुळे होतो. देवी आजारामुळे शेळया – मेंढयाच्या वाढीवर परिणाम होतो. दूध उत्पादन (milk production) कमी होते. बाजारातील किंमत कमी होते. देवी संसर्गजन्य आजार असल्यामुळे कळपातील इतर शेळया – मेंढया लवकर बाधित होतात. रोगाचा प्रसार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या बाधित प्राण्यांच्या श्वासातुन किंवा नाकाच्या स्त्रावातुन होतो. चावणाऱ्या माशांपासुन सुध्दा प्रसार होवू शकतो. दुषित चारा आणि पाण्याद्वारे प्रसार वाढू शकतो.

लक्षणे :

· शेळया-मेंढ्यांना ताप येतो.

· बाधित शेळ्या-मेंढ्या सुस्त, मलुल झाल्याने कळपाच्या मागे राहतात.

· शरीराच्या विविध भागावर कान, तोंड, शेपटीच्या आतील भाग, पोटाच्या खालच्या बाजुस ज्याभागावर केस कमी असतात त्याठीकाणी लालसर पुरळ येतात. पुरळचे रूपांतर फोडात होते, फोड फुटल्यावर त्यावर खपली येते.

· नाकातुन स्त्राव येतो. श्वास घ्यायला त्रास होतो.

· कासेवर आणि सडांवर पुरळ आल्यामुळे पिल्लांना संसर्ग होवु शकतो आणि शेळया-मेंढ्यांना कासदाह होऊ शकतो.

· लहान पिल्लांच्या वाढीवर, दूध उत्पादनावर विपरित परिणाम होतो.

· गाभण प्राण्यात गर्भपात होऊ शकतो.

· या आजाराचे विषाणु कातडीचा पुर्ण भाग बाधित करतात. त्यामुळे जवळपास एक ते दिड महिना कातडीवर व्रण / चट्टे ठळक स्वरूपात दिसत राहतात.

sheep - Goat Pox
करडांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन | Goat Kid Management | ॲग्रोवन

नियंत्रण :

देवी आजार विषाणुजन्य असल्यामुळे ‍विशिष्ट उपचार पध्दती नाही. लक्षणावरून उपचार करावा लागतो.

सर्वात महत्वाचे आजारी शेळया – मेंढ्याचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून कळपातील इतर प्राण्यात संसर्ग होणार नाही.

तोंडावरील फोड पोटॅशियम परमँग्नेटच्या सौम्य द्रावणाने धुवावे. त्यावर जंतूनाशक मलम लावावा. पशुवैद्यकाच्या सल्लने प्रतिजैविके व वेदनाशामक इंजेक्शन द्यावे.

sheep - Goat Pox
शेळ्यांची कोणती जात पाळावी? | Goat Breed Selection Criteria | ॲग्रोवन

देवी आजार बाधित शेळया – मेंढयाच्या संपर्कात येणारे पशुवैद्यक, पशुपालक यांनाही होऊ शकतो. माणसामध्ये हातावर लालसर पुरळ येतात, खाज सुटते. म्हणून योग्य प्रकारे हातमौजे घालुन हाताळणी करावी.

तीन महिने व त्यावरील निरोगी करडे आणि कोकरांना देवी आजाराचे लसीकरण दरवर्षी करावे. आजारी प्राण्यांना लसीकरण करू नये.

डॉ.मिरा साखरे,

सहाय्यक प्राध्यापक,

पशुवैद्यकीय रोगप्रतिबंधकशास्त्र विभाग,

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी

मो. 9423759490

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com