Deshi Cow : बदलत्या हवामानुरूप देशी जनावरांच्या प्रजाती विकसित व्हाव्या

दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना अधिक फायदा व्हावा. तसेच शाश्वत रोजगार निर्मितीसाठी धोरण निश्चित करावे लागेल. दुहेरी उपयोगाच्या देशी वंशाच्या प्रजातींच्या अंनुवंशशास्त्रीय सुधारणेसाठी आर्थिक निधीची गरज आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

परभणी ः ‘‘देशी प्रजातींच्या संवर्धनासाठी धोरण (Indigenous Species) निश्चित करावे लागेल. शेतकरी, पशुपालकांच्या समृद्धीसाठी आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाच्या (Modern Breeding Technology) आधारे दुधाची गुणवत्ता (Milk Quality) सुधारण्यासह, अधिक उत्पादनक्षम, रोग प्रतिकारकक्षम, बदलत्या हवामान स्थितीत तग धरुन राहणाऱ्या प्रजाती विकसित करण्याची गरज आहे, असा सूर ग्रामीण उपजीविका संवर्धनासाठी पशू आनुवंशिक संसाधनांचे व्यवस्थापन’ या विषयावरील २० व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात गुरुवारी (ता.२३) उमटला.

नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील पशुवैद्यकीय पशुअनुवंश व पैदासशास्त्र विभाग आणि पाळीव प्राण्यांची जैवविविधता संवर्धन सोसायटीतर्फे ही परिषद गुरुवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय सभागृहात आयोजिण्यात आली आहे.

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. एस. व्हि. उपाध्ये होते.

Animal Care
Animal Care : जनावरांच्या आजारावर उपयुक्त वनौषधी

संशोधन संचालक डॉ.एन.व्ही.कुरकुरे,विस्तार शिक्षण संचालक डॉ.ए. यु. भिकाने, पुणे येथील ‘बाएफ’चे समूह उपाध्यक्ष डॉ. ए. बी. पांडे, पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. देशमुख, चितळे डेअरीचे कार्यकारी अधिकारी विश्वास चितळे, राष्ट्रीय पशुअनुवंश संसाधन ब्युरो, कर्नालचे संचालक डॉ. बी. पी. मिश्रा, डॉ. पी. व्ही. नांदेडकर, डॉ. ए. के. मिश्रा उपस्थित होते.

डॉ. पांडे म्हणाले, ‘‘दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना अधिक फायदा व्हावा. तसेच शाश्वत रोजगार निर्मितीसाठी धोरण निश्चित करावे लागेल. दुहेरी उपयोगाच्या देशी वंशाच्या प्रजातींच्या अंनुवंशशास्त्रीय सुधारणेसाठी आर्थिक निधीची गरज आहे. अन्न सुरक्षितेसाठी पशुधनाच्या आनुवंशिक संसाधनांचा सुरक्षा कवच म्हणून विचार करावा.’’

Animal Care
Animal Care : गुणवत्तापूर्ण रेतमात्रांचा वापर ठरतोय फायद्याचा...

डॉ. कुरकुरे म्हणाले, ‘‘अनुवंशशास्त्राचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळेच पशुधनाची उत्पादनक्षमता वाढविणे शक्य झाले आहे. धोरणकर्ते तसेच ग्रामीण भागातील पशुवैद्यकांना या परिषदेतील शिफारशी निश्चित उपयुक्त ठरतील.’’

डॉ. भिकाने म्हणाले,‘‘नवीन पिढीतील शास्त्रज्ञ चांगले संशोधन करत आहेत. आधुनिक प्रजनन तंत्राव्दारे दुधाचा दर्जा सुधारण्यासह, हवामान बदलात तग धरुन राहणारे, रोग प्रतिकारक प्रजातींवर संशोधन करावे लागेल. शेतीसाठी आवश्यक देशी गोवंशाच्या बैलांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा लागेल.’’

डॉ. उपाध्ये म्हणाले, ‘‘ग्रामीण उपजीविका संवर्धनासाठी शेतीतील पशुधनाच्या आनुवंशिक संसाधनांच्या संवर्धनासाठी तत्काळ कृती आराखडा अमलात आणण्याची गरज आहे.’’

राष्ट्रीय परिषदेमध्ये सादरीकरणासाठी प्राप्त संशोधन लेखांच्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

परिषदेतर्फे सोसायटीच्या देशातील सदस्यांना पशुअनुवंश आणि पैदास शास्त्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोसायटीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com