Livestock Exhibition : शिर्डी येथे मार्चमध्ये राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शन

पशुपालन क्षेत्रात उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पशुपालकांना व्हावी, याकरिता राज्यस्तरीय पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन येत्या मार्चमध्ये करण्यात आले आहे.
Livestock Exhibition
Livestock ExhibitionAgrowon

Livestock Exhibition नगर, नागपूर : पशुपालन क्षेत्रात उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाची (Modern Technology) माहिती पशुपालकांना व्हावी, याकरिता राज्यस्तरीय पशू-पक्षी प्रदर्शनाचे (Livestock Exhibition) आयोजन येत्या मार्चमध्ये करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे हे प्रदर्शन होईल. या संबंधीचा शासकीय आदेश शुक्रवारी (ता.२४) काढण्यात आला. प्रदर्शनासाठी ३.७४ कोटी रुपयांच्या निधीस शुक्रवारी (ता.२४) मान्यता देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पशुपालन व दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होतो. राज्यात सर्वाधिक दूध उत्पादन देखील याच भागात होते. राज्यातील काही जिल्हे मात्र दुष्काळी तर काही जिल्ह्यांत उन्हाळ्यात सिंचनाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होत नाही. परिणामी दुग्धोत्पादनाला मर्यादा आहेत.

Livestock Exhibition
Animal Care : शेती, जनावरांच्या राखणीसाठी शेतकरी कारवान कुत्राच का निवडतात?

मराठवाडा, विदर्भात नजीकच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या माध्यमातून दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे.

याही पुढे जात राज्यातील पशुपालकांना राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातिवंत पशुपक्षी, त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करण्यासाठी आवश्यक यंत्रे, उपकरणे, औषधी तसेच पशुसंवर्धनाशी निगडित आधुनिक बाबींची माहिती व्हावी, या उद्देशाने राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शन भरविण्यात येईल.

Livestock Exhibition
Animal Care : कुशिरे येथे पशुपालकांना शिबिरात मार्गदर्शन

या प्रदर्शनात विविध उत्पादनांचे स्टॉल राहतील. जातिवंत पशुपक्ष्यांमधून सर्व उत्कृष्ट पशुधनाची निवड करून पशुपालकांना सन्मानित केले जाईल. देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे, देशी गोवंशामध्ये आनुवंशिक सुधारणा घडविणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे रोजगाराच्या संधी देणे व त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध मांस, अंडी उत्पादनाला चालना देणे, जनावरांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे आदी विषयांवर पशुपालकांना मार्गदर्शन केले जाईल.

दीड हजार जनावरे होणार सहभागी

राज्यातील व राज्याबाहेरील गाईंच्या तीस विविध जाती व त्यात प्रत्येकी गाई व बैल दिडशे, म्हशीत ८ ते १० जातीच्या १००, शेळ्यांत १० ते १२ जातीच्या दोनशे शेळ्या, बोकड, मेंढ्यात ८ ते १० जातीच्या २० मेंढ्या, कोंबड्यात १२ ते १५ जातीच्या ४०० कोंबड्या, डुकरात तीन ते चार जातीची ४० पर्यंत डुकरे, तीन ते चार जातींचे पंचवीसपर्यंत घोडे अशी दीड हजारापर्यंत जनावरे यात सहभागी होणे अपेक्षित आहेत.

प्रदर्शनाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांच्यावर असेल. निविदांचा जिल्हास्तरावर मसुदा तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी व दर अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com