खरीपात करा स्टायलोची लागवड!

दुग्धव्यवसायात जनावरांपासून मिळणारे उत्पादन त्यांच्या अनुवांशिकतेबरोबर आहार व्यवस्थापनावरही अवलंबून असते. वर्षभर दुधाचे उत्पादन घ्यायचे झाल्यास, त्यांना चांगल्या प्रतीचा सकस चारा पुरविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
खरीपात करा स्टायलोची लागवड!
Stylo Fodder Cultivation PracticesAgrowon

स्टायलो गवत(stylo fodder) हे बहुवार्षिक चारा (multicut fodder) पिक आहे. स्टायलो गवत हे द्विदल (Dicot) वर्गातील चारा पिक असून ते उंचीने अडीच फुटापर्यंत सरळ वाढत जाते. या गवताला फुटवे येण्याचे प्रमाण जास्त आहे. कमी पाण्यावर देखील स्टायलो गवताची वाढ चांगली होते. स्टायलो गवताच्या वाढीसाठी मुरमाड, पडीक, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते. स्टायलोमध्ये प्रथिनांचे (protein) प्रमाण १२ ते १५ टक्क्यापर्यंत असते.

आपल्याकडे स्टायलो गवताच्या दोन जाती वापरल्या जातात. यामध्ये स्टायलोसथेंन्स हॅमटा आणि स्टायलोसथेंन्स स्क्रबा या दोन जातीची लागवड केली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गवत संशोधन केंद्राने फुले क्रांती (Phule kranti) ही स्टायलो गवताची जात विकसित केली आहे.
पेरणीसाठी जमिनीची एक खोल नांगरणी आणि दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. स्टायलो गवताची लागवड करण्याआधी बियाणे गरम पाण्यात ३ ते ४ मिनिटे भिजत घालावे. एक हेक्टरसाठी जवळपास १० किलो बियाण्यांची गरज पडते. बियाण्याला अडीच ग्रॅम रायझोबियम (Rhizobium) जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. पेरणी करताना बियाणे ठराविक खोलीवर टाकावे. पेरणी ३० × १५ सेंटीमीटर अंतरावर करावी.

Stylo Fodder Cultivation Practices
बहुवार्षिक नेपियर गवत

हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत या गवताची लागवड करावी. या गवताची पेरणी जून ते जुलै दरम्यान करावी. पेरणीनंतर ९० दिवसानंतर पहिली कापणी करावी. ही कापणी जमिनीपासून १० ते १५ सेंटीमीटर अंतरावर करावी. सर्वसाधारणपणे वर्षातून दोन कापण्या पिक फुलोऱ्यात असताना घ्याव्यात. एका हेक्टर मधून २५० ते ३०० क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते.

Stylo Fodder Cultivation Practices
जनावरांनी गाजर गवत खाल्ल्यानंतर होणारे दुष्परिणाम

हिरवा चारा चवीला चांगला आणि जास्त पाचक असल्याने जनावरे हिरव्या चाऱ्याचे चांगल्या प्रकारे पचन करून घेतात. परिणामी शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. शेतकऱ्यामध्ये हिरव्या चाऱ्याच्या सुधारित वाणाची माहिती नसल्याने पावसाळा सोडून इतर ऋतुंमध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता दिसून येते. योग्य चारा पिकांची लागवड करून ही कमतरता कमी करता येऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com