पावसाळ्यात शेळ्यांना होते या रोगाची बाधा !

पावसाळा सुरु झाला कि सर्वत्र कोवळे, हिरवे गवत दिसायला लागते. कोवळे लुसलुशीत गवत शेळ्या-मेंढ्यानी मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने त्यांना आंत्रविषार रोगाची बाधा होत असते.
Enterotoximia Disease In sheep and goat
Enterotoximia Disease In sheep and goat Agrowon

पावसाळा (rainy season) सुरु झाला कि सर्वत्र कोवळे, हिरवे गवत दिसायला लागते. कोवळे लुसलुशीत गवत शेळ्या-मेंढ्यानी मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने त्यांना आंत्रविषार (Entertoximia) रोगाची बाधा होत असते. दुषित चारा किंवा पाण्यावाटे आंत्रविषार रोगाचे जीवाणू जनावरांच्या पोटात प्रवेश करत असतात.

शेळ्या-मेंढ्यांना जंताचा प्रादुर्भाव झालेला असल्यास आतड्यातील वातावरण जीवाणूंच्या वाढीस पोषक असते. कोकरामध्ये आणि करडामध्ये आंत्रविषार रोगाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. या आजारची लक्षणे शेतकऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत बाधित जनावरांचा मृत्यु होतो. लागण झाल्यापासून १२ तासांत करडांचा मृत्यु होतो. यामध्ये करडे दूध पिणे बंद करतात. सुस्तपणे एका ठिकाणी बसून राहतात. त्यांना हिरव्या रंगाची पातळ हगवण होते. तोंडाजवळ फेस येतो. बाधित करडे हवेत उड्या मारून जमिनीवर पडतात.

Enterotoximia Disease In sheep and goat
जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण का करावे?

आंत्रविषार रोग अल्पमुदतीचा असल्याने यावर कोणताही प्रभावी उपचार नाही. बाधित जनावरांला पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके द्यावीत. त्यांना कोवळे, लुसलुशीत हिरवे गवत जास्त प्रमाणात खाण्यास देऊ नये. लहान करडांना तसेच कोकरांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये. यासाठी शेळ्या-मेंढ्याचे पावसाळ्यापूर्वी आंत्रविषार रोगाविरुद्ध लसीकरण करून घ्यावे. तीन महिन्याच्या वरील कोकरांना आणि करडांना लस द्यावी. त्यांनतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. इतर प्रौढ शेळ्या-मेंढ्याचे नियमितपणे वर्षातून दोन वेळा लसीकरण करून घ्यावे. त्यापैकी एक लस मान्सूनपूर्व द्यावी.

Enterotoximia Disease In sheep and goat
मान्सूनपूर्व लसीकरण करा, पशुधन वाचवा! | Before Monsoon Vaccination Drive of cow | ॲग्रोवन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com