गर्भाशय दाहावरील उपाययोजना!

गर्भाशायचे वातावरण निर्जंतुक असते. मात्र काहीवेळेस वातावरणातील रोगजंतू गर्भाशयात प्रवेश करतात, तेव्हा गर्भाशय संसर्ग होतो.
Uterine Infection In Cow
Uterine Infection In CowAgrowon

पशु प्रजनन (Animal Reproduction) व्यवस्थापनात निरोगी, सुदृढ गर्भाशय महत्त्वाची भूमिका बजावते. गर्भाशयाची स्वतःची स्वतंत्र स्वरोगनियंत्रण व्यवस्था असते. गर्भाशायचे वातावरण निर्जंतुक असते. मात्र काहीवेळेस वातावरणातील रोगजंतू गर्भाशयात प्रवेश करतात, तेव्हा गर्भाशय संसर्ग होतो. गर्भाशयाला सूज आल्याने, गर्भाशयाचा दाह होतो. गर्भाशयाचा दाह होण्याचा प्रकार हा जास्त दुधाचे उत्पादन (milk production) देणाऱ्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. गर्भाशयाला संसर्ग झाल्याने दूध उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते.

गर्भाशय दाहाची लक्षणे

गायी-म्हशींमध्ये गर्भाशयाचा दाह हा जनावर विल्यानंतर साधारणतः पहिल्या आठवड्यात दिसून येतो. जनावर वारंवार उलटते. माज पकडत नाही. मुका माज (silent heat) यांसारखी लक्षणे दाखवायला सुरुवात करते. जनावरांच्या दोन वेतातील अंतर वाढते. दूध उत्पादनात घट होते. जनावरांच्या औषधावरील खर्च वाढतो.

Uterine Infection In Cow
जनावरे बसण्याची जागा कशी असावी? | cow seating arrangement in shed | ॲग्रोवन

जनावरांमध्ये गर्भाशयाचा दाह का होतो? ते आता पाहूयात-

· गर्भाशयास इजा झालेली असल्यास.

· जनावरांमध्ये अनुवांशिक गर्भपाताची समस्या असल्यास.

· गायीची कष्ट प्रसूती झालेली असल्यास.

· विल्यानंतर वार अडकून राहिलेली असल्यास.

Uterine Infection In Cow
दुधाळ जनावरे व शेळी वाटप योजना

उपाययोजना

· दुधाळ जनावरांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर उर्जावर्धक औषध द्यावे.

· गोठयामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी. गोठा नेहमी मोकळा व कोरडा असावा.

· गोठ्यात अधिक ओलावा व घाण असल्यास गर्भाशयाचा दाह होण्याचे प्रमाण वाढते.

· प्रसूतीनंतर दररोज किमान एक आठवडा कोमट पाण्यात पोटॅशिअम परमॅंगनेटचे सौम्य प्रमाण वापरून द्रावण जनावरे स्वच्छ करण्याकरिता वापरावा.

· दररोजच्या खाद्यात क्षार मिश्रण, गुळाचा वापर करावा.

· जनावरांना संतुलित खाद्याचा पुरवठा करावा.

· जनावरांतील गर्भाशयाच्या आजाराविषयी वेळोवेळी पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घ्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com