पावसाळ्यात जनावरांना का होते पोटफुगी?

पावसाळ्यात नवीन उगवलेले कोवळे हिरवे गवत जनावरांनी जास्त खाल्ल्याने त्यांना पोट्फुगीचा त्रास सुरु होतो.
पावसाळ्यात जनावरांना का होते पोटफुगी?
Bloat In AnimalsAgrowon

पावसाळा सुरु झाला की, सर्वत्र हिरवे, कोवळे गवत उगवायला सुरुवात होते. कोवळे हिरवे गवत (Green Fodder) जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना पोटफुगीचा त्रास सुरु होतो. जनावरांचे डाव्या बाजूचे पोट फुगते. पोटातील वायुचे (gas) प्रमाण वाढल्याने पोटाची डावी बाजू वर येते.

जनावरांमधील पोटफुगीचे (Bloat) प्रामुख्याने दोन प्रकार असतात. शरीरात अधिक प्रमाणात तयार होणाऱ्या वायुमुळे आणि तयार होणारे वायु आवश्यक प्रमाणात शरीराबाहेर टाकला न गेल्यामुळे. प्राथमिक अवस्थेतील पोटफुगी आहारातील (feed) बदलामुळे होत असते. आहारात सुक्या चाऱ्याचे कमी प्रमाण, आहारातील अचानक बदल यांचा समावेश होतो. द्वितीय अवस्थेतील पोटफुगी वायु शरीराबाहेर न टाकल्यामुळे होत असतो. अन्ननलिकेत काही अन्नघटक फसून राहिल्याने, खाद्याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने दिसून येते.

Bloat In Animals
जनावरांमध्ये पोटफुगी झाल्यास दिसतात ही लक्षणे  

पोटात तयार झालेला वायू बाहेर न पडल्यास, तो पोटातच अधिक काळ साचून राहिल्याने, जनावरांचे डावीकडील पोट फुगलेले दिसून येते. त्या ठिकाणी हात मारल्यास विशिष्ट प्रकारचा आवाज घुमतो. पोटदुखी होते, जनावर वारंवार लघवी आणि शेण टाकते. श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी जनावर तोंड उघडून मान वर करून श्वास घेण्यास सुरुवात करते. कोटीपोटाची हालचाल कमी होते. जनावर बैचेन होते. चारा खाणे, पाणी पिणे बंद होते.

Bloat In Animals
हायड्रोपोनिक चारा म्हणजे काय?

पोटफुगीवर उपाय म्हणून आहारात जास्त प्रथिने असलेल्या चाऱ्याचा समावेश टाळावा. भरडलेल्या धान्याचा आहारातील समावेश कमी करावा. आहारात तंतुमय पदार्थांचा वापर योग्य प्रमाणात करावा. असे केल्याने जनावरांना चयापचय क्रियेत मदत होते.

पोटफुगीमध्ये प्राथमिक उपचार म्हणून पोटाच्या डाव्या बाजूला मसाज करावा. जनावरांच्या आहारात बदल करताना तो टप्प्या-टप्प्याने करावा. पोटफुगी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जनावरांना उंच भागावर उभे करावे. तोंडाकडील भाग वरच्या दिशेने ठेवावा. यामुळे वायु बाहेर पडण्यास मदत होईल. जनावराच्या तोंडात लाकडी काठी बांधल्यास लाळ स्रावून पोटफुगी कमी होण्यास मदत होते. पोटफुगीची तीव्रता जास्त असल्यास पशुवैद्याकडून तत्काळ उपचार करून घ्यावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com