Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा तोकडी

‘लम्पी स्कीन’ची समस्या रोखणार कशी; खासगी पशुवैद्यकांची चांदी
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

जळगाव ः ‘लम्पी स्कीन’ची समस्या (Lumpy Skin Issue) पशुधनात (Livestock) मागील दोन वर्षांपासून सतत दिसत आहे. परंतु खानदेशात ८० टक्केही लसीकरण (Lumpy Skin Vaccination) मागील दोन वर्षांत झाले नाही. यातच यंदा ही समस्या हाताबाहेर जात आहे. पशुसंवर्धन विभागात (Department Of Animal Husbandry) अत्यल्प कर्मचारी व अधिकारी संख्या असल्याने रोगाला थोपविण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. यातच खासगी पशुवैद्यकांनी गावोगावी बाजार मांडला असून, शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

खासगी पशुवैद्यकांसाठी ही कमाई करण्याची नवी संधीच जणू आहे. कारण जिल्हा परिषद किंवा शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी पुरेसे नाहीत. जळगाव जिल्ह्यात १५२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. खानदेशात ही संख्या सुमारे २७० एवढी आहे. यात श्रेणी एकमध्ये सुमारे १०५ पशुवैद्यकीय दवाखाने खानदेशात आहेत.

Animal Husbandry
Lumpy Skin : अमरावती जिल्ह्यात पशूंसाठी ‘लॉकडाउन’

जळगाव जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ४८, सहायक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची १३, पशुधन पर्यवेक्षकांची ४२ पदे रिक्त आहेत. धुळे व नंदुरबारातही ३० - ३० टक्के पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षक गावोगावी पशुधनावर उपचार करतात. काही जण खासगी व्यवसायही शासकीय कामकाज आटोपल्यानंतर करतात. खासगी पशुवैद्यक गावोगावी जाऊन रोगाबाबत माहिती देऊन नवीन बाजार तयार करीत आहेत. विविध जीवनसत्त्व व इतर औषधे पशुधनाला देत आहेत.

Animal Husbandry
Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराबाबत जालन्यात नियंत्रित क्षेत्र घोषित

एका पशुधनाला इंजेक्शन व किरकोळ उपचारासाठी किमान ५०० रुपये ही मंडळी उकळत आहे. जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग याबाबत आपल्याला काहीएक माहिती नसल्याचा आव आणत आहे. जिल्हा सहकारी दूध संघाकडून या रोगाबाबत कार्यवाही सुरू आहे. पण तीदेखील अपुरी आहे. यामुळे गायीच्या दुधाचा मोठा तुटवडा जळगाव जिल्ह्यात तयार झाला आहे. दूध दरवाढ मध्यंतरी दोन रुपयांनी जिल्ह्यात झाली आहे.

पशुधनाला ताप येणे, चारा न खाणे अशी समस्या तयार होत आहे. रोगाची समस्या असतानादेखील पशुवैद्यकीय दवाखान्यात कुणी सापडत नाही. सकाळी ही मंडळी असते. दुपारी गायब होते. सर्व कारभार रामभरोसे सुरू आहे. पशुसंवर्धन विभाग कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. रोगाबाबत रावेर, यावल, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा, धुळ्यातील शिंदखेडा, साक्री, धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, नवापूर, अक्कलकुवा आदी भागांत समस्या वाढत आहे. रोगाला बळी पडणाऱ्या पशुधनाची संख्या वाढत आहे. पण लसीकरण संथ आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com