Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ रोखण्यासाठी वेळीच काळजी घ्या ः डॉ. झोड

लम्पी स्कीन हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला, तरी यामध्ये पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी पशुपालकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

औरंगाबाद : ‘‘लम्पी स्कीन (Lumpy Skin) हा पशुधनातील (Livestock Disease) वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला, तरी यामध्ये पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी पशुपालकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावरांना लम्पी स्कीन आजारांची (Lumpy Skin Disease) लागण होण्यापासून वाचविता येईल,’’ असा सल्ला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी पशुपालकांना दिला.

Lumpy Skin Disease
Lumpy skin : ‘लम्पी स्किन'चा होतोय प्रसार

डॉ. झोड म्हणाले, ‘‘औरंगाबाद जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील आठ गावांत ३२ पशुधनाला लम्पी स्कीन आजाराची लागण झाली. परंतु वेळीच उपचार केल्याने त्यापैकी २९ जनावरे बरी झाली आहेत. जिल्ह्यात जवळपास ३० हजार लस उपलब्ध आहेत. १७०१६ जनावरांना लसीकरण करायचे आहे, तर ५४६० जनावरांचे लसीकरण झाले आहे.’’

...या आजाराची प्रमुख लक्षणे

प्रथम जनावरांचे चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.

१०४ ते १०५ डिग्री एफ. ताप येतो

अचानक दुधाचे प्रमाण कमी होते.

जनावरांच्या डोळ्यांतून व नाकातून पाणी येते

हळूहळू डोके, मान, मायांग, कास आदी भागांच्या त्वचेवर १० ते ५० मि.मी. व्यासाच्या गाठी येतात.

आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.

डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, दृष्टी बाधित होते.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखा.

निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे ठेवा.

गायी व म्हशींना एकत्रित ठेवू नका.

प्रादुर्भावग्रस्त परिसरात १ टक्का फॉर्मालीन किंवा २ ते ३ टक्के सोडिअम हायपोक्लोराइट, २ टक्के फिनॉल यांची फवारणी करा.

या आजाराने जनावरांचा मृत्यू झाल्यास ८ फूट खोल खड्ड्यात विल्हेवाट लावावी. त्याच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकावी.

आजारी जनावरांवर व गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com