Lumpy Skin : लम्पी स्कीन गांभीर्याने घ्या

माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती साखर कारखान्याच्या आगामी ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुमारे २० हजार जनावरे बारामती, इंदापूर तालुक्यात अधिकची येतील.
Lumpy Skin Baramati
Lumpy Skin BaramatiAgrowon

माळेगाव : ‘‘माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती साखर कारखान्याच्या (Sugar Factory Baramati) आगामी ऊस गळीत हंगामाच्या (Sugarcane Crushing Season 2022) पार्श्वभूमीवर सुमारे २० हजार जनावरे बारामती, इंदापूर तालुक्यात अधिकची येतील. लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Out Break) प्रादुर्भाव अधिक असलेल्या मराठवाड्यातून ही जनावरे आहेत. त्यामुळे लम्पी स्कीन गांर्भीयाने (Seriousness Of Lumpy Skin) घ्या,’’ असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

Lumpy Skin Baramati
Lumpy Skin Disease : सैन्य-अस्त्राविनाच ‘लम्पी’शी लढाई

पशुसंवर्धन विभाग, बारामती सहकारी दूध संघातर्फे डॉक्टर, दूध संस्थांसह साखर कारखाना पदाधिकाऱ्यांची बैठक बारामती येथे घेण्यात आली. या वेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. त्रिंबक, शिवाजी टेंगले, सागर जाधव, महाव्यवस्थापक डॉ. सचिन ढोपे, बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, डॉ. आर. आर. पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले,‘‘लम्पी स्कीन आजारामुळे पशुधन अडचणीत आहे. बारामतीत सव्वा लाख जनावरांपैकी ७७ हजार जनावरांना लसीकरण झाल्याची नोंद आहे. सरकारी पशुतज्ज्ञांची कमतरता असली तरी दूध संघाबरोबर पशुसंवर्धन विभागाने उपलब्ध मनुष्यबळावर चांगले योगदान दिले.

Lumpy Skin Baramati
Lumpy Skin : ‘आरे’ प्रक्षेत्र लम्पी स्कीन संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्र बाधित घोषित

साखर हंगाम पुढील महिन्यात सुरू होत आहे. सुमारे ३० ते ४० टक्के ऊस बैलगाड्यांमार्फत आणला जातो. त्यामुळे लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याचे सर्वांपुढे आव्हान असेल. आतापासूनच या आजाराबाबत काळजी घ्यावी.’’

डॉ. त्रिंबक म्हणाले, ‘‘कोरोना काळातील परिस्थितीप्रमाणे लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी काम करणे आवश्यक आहे.’’

यावेळी लम्पी स्कीनवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना येणाऱ्या अडचणी उपस्थितांनी अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे ग्रामपंचायत प्रशासनही सक्रिय राहील, असे या वेळी सांगण्यात आले.

बारामतीत प्रादुर्भाव अत्यल्प

बारामती दूध संघ आणि शासनाचा पशुसंवर्धन विभागाने लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. परिणामी तालुक्यात हा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुपालकांनीही काळजी घेत गोठे स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन जगताप यांनी केले. लसीकरणासाठी पशुपालकांकडून कोणी पैसे घेतल्यास संबंधितावर निलंबनाची कारवाई केली जाईल , असा इशारा जगताप यांनी दिला .

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com