Lumpy Skin : अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ‘लम्पी स्कीन’चा मृत्युदर कमी

देश पातळीवरील ‘लम्पी स्कीन’चा प्रसार आणि प्रादुर्भाव पाहता महाराष्‍ट्रात हा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. राज्यातील दोन कोटी पशुधनांपैकी २ हजार ७७ पशुधन बाधित असून, केवळ ७७ पशुधन मृत झाले आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

पुणे ः देश पातळीवरील ‘लम्पी स्कीन’चा (Lumpy Skin Outbreak) प्रसार आणि प्रादुर्भाव पाहता महाराष्‍ट्रात हा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. राज्यातील दोन कोटी पशुधनांपैकी (Livestock) २ हजार ७७ पशुधन बाधित (Livestock Infected With Lumpy) असून, केवळ ७७ पशुधन मृत झाले आहे. हाच मृत्युदर (Lumpy Skin Death Rate) राजस्थानात ५३ हजार, पंजाबमध्ये १७ हजार एवढा आहे. यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता पशुधनावरील लक्षणांवर लक्ष ठेवून तातडीने उपचार करून घ्यावेत. तर राज्यातील सर्वच सुमारे दोन कोटी पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी दिली.

पुण्यात शुक्रवारी (ता. १६) पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सध्या ७५ लाख लसींची मागणी केली असून, टप्प्याटप्प्याने लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण होणार आहे. तर लसीकरण आणि औषधोपचार राज्य शासनाकडून मोफत केले जाणार आहे, असेही विखे पाटील म्हणाले. या वेळी पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : जनावरांचा तातडीने विमा उतरवावा ः शेट्टी

मंत्री विखे पाटील म्हणाले, ‘‘लम्पीचा महाराष्ट्रातील शिरकाव जळगाव जिल्ह्यातून झाला आहे. यामुळे तातडीने बाधित पशुधनाच्या गावातील पाच किलोमीटर परिसरातील पशुधनाचे लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. ज्या ज्या गावांमध्ये बाधित पशुधन आढळले आहे, त्या त्या गावांच्या पाच किलोमीटर परिसरातील पशुधनाचे लसीकरण तातडीने सुरू केले आहे. राज्यात आतापर्यंत ८ लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

तर लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या एक हजार विद्यार्थ्यांसह खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांची मदत लसीकरणासाठी घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या विद्यार्थ्यांना प्रति पशुधन ३ रुपये मानधन दिले जाणार आहे.’’

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : दहा तालुक्यांत ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

लसीकरणाअभावी पशुधनाला बाधा होऊन ते मृत होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या बाधित पशुधनाच्या पाच किलोमीटर अंतरातील पशुधनाच्या लसीकरणाची अट राज्य शासनाने काढून सरसकट सर्वच पशुधनाचे लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी सध्या ७५ लाख लसींची मागणी केली असून, दोन दिवसांत ५० लाख लसींचा पुरवठा होणार आहे. ही लस विविध जिल्ह्यांतील बाधित पशुधनाच्या संख्येनुसार वितरित केली जाणार आहे. तर बाधित सर्व पशुधनाचा औषधोपचार राज्य शासन मोफत करणार आहे, असेही विखे यांनी सांगितले.

दूध, चिकनवर परिणाम नाही

लम्पीचा दूध आणि चिकनवर कोणताही परिणाम झालेला नाही. तर दूध संकलनावर देखील परिणाम झालेला नाही. यामुळे समाजमाध्यमांवर कोणी चुकीची माहिती पसरवत असतील, त्यांच्यावर सायबर गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शेळी-मेंढी बाजार बंद नाहीत

‘लम्पी’चा प्रसार होऊ नये यासाठी आंतरराज्य,

आंतरजिल्हा आंतर तालुका गाय, म्हैस यांची वाहतूक आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र शेळी- मेंढीवर बंदी नसून, पशुधनाच्या बाजारात शेळी- मेंढी विक्रीवर कोणतीही बंदी नाही. या बाबतच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आल्या आहेत, असेही विखे यांनी सांगितले.

‘एनडीआरफ’च्या निकषांनुसार भरपाई

‘लम्पी’ रोगामुळे पशुधन मृत झाल्यास पशुपालकांना त्याची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. यामध्ये दुधाळ पशुधनासाठी ३० हजार, जडकाम करणाऱ्या पशुधनाला २५ हजार, वासरांना १५ हजार तर जिल्हा परिषदेद्वारे सानुग्रह अनुदान म्हणून १० हजार रुपये दिले जाणार आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com