जायदेवाडीत येथे २४ जनावरांचा मृत्यू

मुसळधार पावसाने (Heavy Rain) भीमाशंकर परिसरातील जायदेवाडी (निगडाळे) येथे गेल्या पाच दिवसांत एकवीस शेळ्या, दोन बैल व एका वासराचा मृत्यू झाला आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

मंचर, जि. पुणे : एक जुलैपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात (Tribal Area) पडत असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) भीमाशंकर परिसरातील जायदेवाडी (निगडाळे) येथे गेल्या पाच दिवसांत एकवीस शेळ्या, दोन बैल व एका वासराचा मृत्यू झाला आहे. पशुधन मालकांना आर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जायदेवाडी ही निगडाळेच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर आहे. येथील शेतकरी डोंगर परिसरात शेळ्या-मेंढ्या, बैल चरायला घेऊन जातात. याठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Heavy Rain
Chilli: आंध्र प्रदेशात मिरचीचा ठसका का वाढतोय?

ढगाळ वातावरण, संततधार पाऊस यामुळे येथे सूर्यदर्शन झाले नाही. त्यातच काही प्रमाणात असलेली थंडी वाढली आहे. गेल्या पाच दिवसांत वामन लोहकरे यांच्या दहा शेळ्या, पाच करडे आणि एका बैलाचा, गेनू कावजी लोहकरे यांच्या सहा शेळ्या व एका बैलाचा आणि मारुती डामसे यांच्या एका वासराचा मृत्यू झाला आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने हैराण झालेल्या बळीराजाला पुन्हा एकदा फटका दिल्याने येथील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. संबंधित घटनेचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून पशुपालकांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वामन लोहकरे, लिलाबाई लोहकरे, गेनू लोहकरे, योगेश लोहकरे, मारुती डामसे, महेश लोहकरे, अंकुश लोहकरे व उमेश लोहकरे यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com