Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

Lumpy Skin : दगावलेल्या जनावरांचा आकडा साडेचार हजारांकडे

जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावामुळे दगावलेल्या जनावरांचा आकडा ४,४३० झाला आहे.

बुलडाणा ः जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’च्या (Lumpy Skin) प्रादुर्भावामुळे दगावलेल्या जनावरांचा आकडा ४,४३० झाला आहे. दररोज या आजारामुळे मृत्यू (Animal Death) होत असून, लवकरच हा आकडा साडेचार हजारांवर पोहोचू शकतो, अशी परिस्‍थिती आहे.

Lumpy Skin
Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

जिल्ह्यात एकूण जनावरांपैकी सुमारे ४४ हजारांवर जनावरे या आजाराने बाधित झाली होती. त्यातून ३८ हजार जनावरे सुधारली असून, आतापर्यंत ४४३० जनावरांचा मृत्यू ओढवलेला आहे. यंत्रणांनी लम्पी स्कीन हा आजार रोखण्यासाठी सुमारे तीन लाख ९७ हजार जनावरांचे लसीकरणसुद्धा केले आहे. असे असतानाही गंभीर बाधित असलेल्या जनावरांना पूर्णपणे दुरुस्त करण्यात उपाययोजना पुरेशा ठरलेल्या नाहीत. दररोज जनावरांचे मृत्यू होत आहेत. जिल्ह्यात लम्पी स्कीनमुळे दगावणाऱ्या जनावरांचा दर हा सुमारे १० टक्क्यांपर्यंत असून राज्यात सर्वाधिक मानला जातो.

Lumpy Skin
Lumpy Skin : रत्नागिरीत ‘लम्पी स्कीन’मुळे १२ जनावरांचा मृत्यू

आजवर मृत्यू झालेल्या जनावरांसाठी मोबदला म्हणून शासनाकडून जिल्ह्यात तीन कोटी १८ लाख १३ हजारांचा निधी मिळाला होता. १,२३० जनावरांच्या मालकांना हा निधीवाटप करण्यात आला. अद्याप सुमारे ३,२०० जनावरांच्या मालकांना शासकीय मदत मिळण्यासाठी निधीची आवश्‍यकता असल्याची माहिती मिळाली आहे. निकषानुसार दुधाळ गायींसाठी ३० हजार रुपये, बैल २५ हजार रुपये, तर वासरासाठी १६ हजार रुपये शासकीय मदत जाहीर करण्यात आली आहे.

मोताळ्यातील ५२८ जनावरे दगावली

जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात दुग्धोत्पादनात आघाडीवर मानला जातो. याही तालुक्यात लम्पी स्कीन रोगाने जनावरांना पछाडले होते. आजही तालुक्यात सुमारे पावणे दोनशेपेक्षा अधिक जनावरे बाधित असून त्यातील २३ जनावरे गंभीर स्वरूपाची आहेत. तर, आजवर ५२८ जनावरे दगावली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com