Milk rate: या घटकांचा दुधातील स्निग्धपदार्थावर होतो परिणाम

दुधाचे दर दुधातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण व स्निग्धपदार्थ विरहित धृतांश यावर ठरवले जातात.
Milk Rate
Milk RateAgrowon

दुधाचे दर (Milk Rate) दुधातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण व स्निग्धपदार्थ विरहित धृतांश यावर ठरवले जातात. दुधातील स्निग्ध पदार्थ (Fat) व एसएनएफ (SNF) यांच्या प्रमाणावर प्रतिलिटर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रमाण अवलंबून असते. म्हणून दुधातील प्रत्येक घटकाचे प्रमाण हे महत्त्वपूर्ण आहे. त्याकरिता या घटकांच्या प्रमाणावर परिणाम करणारे घटक यांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दुधातील स्निग्ध पदार्थावर परिणाम करणाऱ्या घटकांची पुढील माहिती दिली आहे.

Milk Rate
दूध कंपन्यांच्या नफावाढीला बळ?

गायीच्या कासेतील दूध जर दोन ते तीन वेळ काढावयाची वेळ आल्यास त्याचा परिणाम दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश या दोन्हीवर झालेला दिसतो.

- वर्षातील हंगामाचा दूध उत्पादन व स्निग्धांश या दोन्हींवर परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण वाढते तर उन्हाळा व पावसाळ्यामध्ये ते कमी होते.

- गाभणकाळात जर जनावरास सकस आहार मिळाल्यास विण्याच्या वेळेस जनावराची शारीरिक स्थिती सुदृढ व निरोगी राहते व त्यामुळे दूध व दुधातील घटकांचे प्रमाणही उत्तम राहते.

- वारंवार दूध दोहणाच्या वेळा बदलणे, दोन दोहनातील कालावधी कमी-जास्त करणे.

- जर जनावर आजारी व रोगग्रस्त असल्यास दूध उत्पादनाबरोबरच दुधातील घटकांच्या प्रमाणावर अनिष्ट परिणाम होतो.

- दूध दोहन करतेवेळी सुरवातीच्या दुधात अत्यंत कमी प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात, तर शेवटच्या दुधात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात.

- वयस्कर जनावरांच्या दुधातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे तरुण जनावरांच्या दुधातील स्निग्ध पदार्थांपेक्षा कमी असते.

- कासेतील दूध अर्धवट काढल्यास त्यातील घटकांचे प्रमाण कमी होते.

Milk Rate
Goat : जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी?

ऑक्सीटोसीनमुळे दूध उत्पादन व दुधातील घटकांचे प्रमाण या दोन्हींवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. काही औषधींमुळे जनावरातील पचनक्षमता कमी होऊन दूध उत्पादन व दुधातील घटक यावर प्रतिकूल परिणाम होतो.

- जास्त दूध देणाऱ्या गायी/म्हशीच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असते, तर कमी दूध देणाऱ्या गायी/म्हशीच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते.

- विविध प्रवर्गातील जनावरांच्या दुधातील घटकांचे प्रमाण हे वेगवेगळे असते. तसेच प्रत्येक जनावराच्या दुधातील घटकांचे प्रमाण हे वैयक्तिक स्तरावरही वेगवेगळे असते.

- ज्या जनावरांच्या आहारात वाळल्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असते, त्यांचे दूध उत्पादन कमी असते, तर दुधातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते. याउलट ज्या जनावरांच्या आहारात हिरवा चारा जास्त प्रमाणात असेल तर दूध उत्पादन जास्त असते व दुधातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असते.

- व्याल्यानंतर प्रथमतः घट्ट चीक मिळतो व हळूहळू दूध उत्पादन वाढून दुधातील घटकांचे प्रमाण कमी होते, तर दूध देण्याच्या शेवटच्या काळात दूध उत्पादनात घट होऊन दुधातील घटकांचे प्रमाण वाढते.

- दोन वेळच्या दूध काढण्याच्या दोहनातील अंतर वाढल्यास दूध उत्पादन वाढलेले दिसते. परंतु स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com