Lumpy Skin : ‘लम्पी’चा यंदाचा म्युटंट गेल्या वर्षीपेक्षा घातक

आहे. यंदा जनावरांना बाधा पोहोचविणारा म्युटंट हा अधिक घातक आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढल्याची नोंद संशोधक संस्थांनी घेतली आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

नागपूर ः देशात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) वाढत आहे. एक लाखापेक्षा अधिक जनावरे यामुळे दगावली आहेत. महाराष्ट्रात सात हजारांवर जनावरांच्या मृत्यूची (Livestick Died Due To Lumpy Skin) नोंद पशुसंवर्धन खात्याने (Department Of Animal Husbandry) गुरुवार (ता.२०) पर्यंत घेतली आहे.

यंदा जनावरांना बाधा पोहोचविणारा म्युटंट हा अधिक घातक आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढल्याची नोंद संशोधक संस्थांनी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने ‘ट्रिटमेंट प्रोटोकॉल’मध्ये परिस्थितीनुरूप बदलाची शिफारस केली आहे. उपचाराबाबत तब्बल पाच ॲडव्हायसरी ‘माफसू’कडून देण्यात आल्या आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनग्रस्त जनावरांकडे नको दुर्लक्ष...

देशात गेल्या काही महिन्यांपासून गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला आहे. तब्बल १६ राज्यांतील जनावरांना यांची लागण झाली आहे. त्यानुसार सद्यःस्थितीत देशभरात बाधित जनावरांची संख्या २१ लाख ९३ हजारावर पोचली आहे. सोमवारच्या (ता. १०) आकडेवारीनुसार बाधित जनावरांपैकी सुमारे १ लाख ११ हजार १०३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक ७२ हजार ६८८ जनावरे राजस्थानमधील आहेत. त्या पाठोपाठ पंजाबमध्ये १७ हजार ९१०, हिमाचल ७ हजार ४३८, गुजरात ६ हजार १३० गोवंशीय जनावरे आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : सांगलीत लसीकरणानंतरही वाढतोय लम्पी स्कीनचा संसर्ग

राज्यातील बाधित जनावरांची संख्या १ लाख ३ हजार ३१३ इतकी आहे. ७७ हजार ११८ जनावरे उपचारांती बरी झाली आहेत. तब्बल ७ हजार ३९४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. बाधित संख्या आणि मृत्यूचे प्रमाण यामध्ये बुलडाणा जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. एकूण सात हजारपैकी अडीच हजार जनावरे एकट्या बुलडाण्यातील आहेत, असे पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.

जनावरे दगावण्याच्या क्रमवारीत अकोला दुसऱ्या, अमरावती तिसऱ्या, तर जळगाव चौथ्या स्थानावर आहे. राज्यातील ३२ जिल्ह्यांत २ हजार ८२० गावांमध्ये याचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रादुर्भाव वाढल्याने पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा त्यावर नियंत्रणात अपुरी पडत होती. त्यामुळे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून त्यांच्या अधिनस्त ३०७ शिकाऊ (इंटर्न) उमेदवारांसह २० कर्मचाऱ्यांची पथके, तसेच चार फिरती पथके तैनात करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात बाधित व मृत जनावरांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या भागात अधिक शिकाऊ उमेदवार पाठविण्यात आले, असे ‘माफसू’चे विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी सांगितले.

म्युटेशन होऊन तीव्रता वाढली

दरम्यान, या वेळचा म्युटंट अधिक घातक असल्याने ही साथ नियंत्रणात येण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. २०२० मध्ये २ लाख ६८ हजार जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र तेव्हाचा विषाणू अधिक घातक नसल्याने ही साथ वेळीच नियंत्रणात आली. त्या वेळी केवळ १८ जनावरांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये ३८ हजार जनावरांना याची लागण होत एकाही जनावरांचा मृत्यू झाला नव्हता. या वेळी मात्र म्युटेशन होत तीव्रता वाढल्याने जनावरे दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे.

राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे तुलनेत महाराष्ट्रात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. एक कोटी ३९ हजार जनावरांसाठी १ कोटी ४० लाख लसींची उपलब्धता राज्यात आहे. आजवर ९३ टक्‍के लसीकरण झाले आहे. ‘माफसू’ने देखील ट्रीटमेंट प्रोटोकॉल परिस्थितीनुरूप वारंवार बदलाचे धोरण ठेवले आहे. सोबतच पाच ॲडव्हायसरी देण्यात आल्या आहेत.
डॉ. अनिल भिकाने, विस्तार संचालक, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com