Animal Care : जनावरांमध्ये चिलटांमुळे होतो हा आजार

पावसाळ्याच्या दिवसात ओलसर आणि दमट हवामानामुळे गोठ्यात चिलटांचा वावर वाढतो. ही चिलटे छोटी जरी असली तरी फार त्रासदायक असतात.
Animal tiva Disease
Animal tiva DiseaseAgrowon

पावसाळ्याच्या दिवसात ओलसर आणि दमट हवामानामुळे गोठ्यात चिलटांचा वावर वाढतो. ही चिलटे छोटी जरी असली तरी फार त्रासदायक असतात. या चिलटांमुळे जनावरांमध्ये विविध आजारांचा प्रसार होतो. त्यापैकी तिवा हा चिलटांद्वारे पसरणारा विषाणूजन्य आजार (Viral Disease) आहे. आजाराची लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्या लागतात. तिवा आजार (Tiva Disease) होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक दूध देणाऱ्या गायी आणि नर जनावरांत अधिक असते. या आजारास डेंगी किंवा तिव असेही म्हणतात. या आजारामुळे बहुतांश जनावरे तीन दिवस बाधित होतात आणि त्यानंतर निसर्गतः बरी होतात. बाधित जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण नगण्य असले, तरी दुग्धोत्पादन आणि वळूच्या कार्यक्षमतेत प्रचंड घट होते. मराठवाडा कृषी विद्यापीठाने या आजाराची कारणे आणि उपचारा विषय़ी पुढील पाहिती दिली आहे.

Animal tiva Disease
उर्जेच्या कमतरतेमुळे जनावरांना होतो ‘हा’ आजार !

कारणे कोणती आहेत?
आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक दूध देणाऱ्या गायी आणि नर जनावरांत अधिक असते.
सहा ते बारा महिन्यांच्या वासरांना प्रादुर्भाव झाल्यास लक्षणे अतिशय सौम्य असतात. दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जनावरांत आजाराची तीव्रता जास्त असते.
लक्षणे न दाखविणारी बाधित जनावरे आणि क्युलिकोइड चिलटे या आजाराचा प्रसार करतात. वातावरण आणि चिलटांचा प्रादुर्भाव यावर रोगप्रसार अवलंबून असतो.
पावसाळा आणि हिवाळ्यातील वातावरणात अचानक होणाऱ्या बदलांमुळे जनावरांवर येणारा ताण या आजाराच्या प्रादुर्भावाची पूर्वनिश्‍चिती करतो.
चिलटे वाऱ्याच्या प्रवाहासोबत इतरत्र वाहून जात असल्याने हा आजार आजूबाजूच्या गावांत सुद्धा पसरतो.
आजाराचा प्रादुर्भाव आणि तीव्रता दरवर्षी बदलत जाते. एकदा आजार येऊन गेल्यानंतर ठरावीक काळानंतर या आजाराचा प्रादुर्भाव पुनःपुन्हा जाणवू शकतो. मात्र बाधा होऊन बऱ्या झालेल्या जनावरांत जीवनभरासाठी रोगप्रतिकारशक्ती तयार होते.

उपचार काय आहेत?
आजारावर कोणताही विशिष्ठ उपचार नाही. परंतु आजार जडल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके, सलाइन, कॅल्शिअम, ब जीवनसत्त्वे, ताप निवारक आणि वेदनाशामक औषधे द्यावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com