Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ बाधित १८ पशूंवर उपचार सरू

वाशीम ः जिल्ह्यात आतापर्यंत ‘लम्पी स्कीन’ची ३४ जनावरांना बाधा झाली असून, त्यापैकी १५ जनावरे औषधोपचारानंतर बरी झाली आहेत. १८ जनावरांवर उपचार केले जात आहेत.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

वाशीम ः जिल्ह्यात आतापर्यंत ‘लम्पी स्कीन’ची ३४ जनावरांना बाधा (Lumpy Skin Infection) झाली असून, त्यापैकी १५ जनावरे औषधोपचारानंतर (Lumpy Skin Treatment) बरी झाली आहेत. १८ जनावरांवर उपचार केले जात आहेत. आतापर्यंत एका जनावराचा या रोगामुळे मृत्यू (Animal Died Due To Lumpy Skin) झाला. ‘लम्की स्कीन’चा प्रादुर्भाव लक्षात घेता १२ गावांतील ३८१९ जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांनी दिली.

Lumpy Skin
Lumpy Skin : गोठ्यांना मरणकळा ‘लम्पी स्कीन’पुढे पशुपालक हतबल

जिल्ह्यात एक लाख ६८ हजार ९१ गायी तर ५३ हजार ८२६ म्हशी आहेत. रिसोड तालुक्यातील वाकद येथे १५, खडकी (सदार) येथे पाच, वाशीम तालुक्यातील कामठवाडा येथे एक आणि मंगरूळपीर तालुक्यातील नागी येथे एका जनावराला ‘लम्पी स्कीन’ची बाधा झाली. ज्या गावांमध्ये बाधित जनावरे आढळून आली अशा गावांच्या पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गुरे व म्हैस वर्गीय जनावरांचे लसीकरण ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे मृत पशुधनासाठी मिळणार मदत

या आजाराबाबत समाज माध्यमातून गैरसमज पसरविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि पशुपालकांनी यावर विश्‍वास ठेवू नये. लम्पी झालेल्या जनावरांचे दूध हानिकारक नाही. ते पिण्यास योग्य आहे. माणसाला जनावरांपासून लम्पी आजाराचा संसर्ग होत नाही. तसेच कोंबड्या व बकऱ्यांवर लम्पीचा संसर्ग होत नाही. त्यामुळे त्यांचे मास खाण्यास कोणतीही भीती बाळगू नये, असेही डॉ. वानखेडे यांनी म्हटले.

जिल्हाधिकाऱ्यांची नागी येथे भेट

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी गुरुवारी (ता. १५) मंगरूळपीर तालुक्यातील नागी गावाला भेट देऊन प्रतिक चुमळे यांच्या ‘लम्पी स्कीन’ बाधित गुरांची पाहणी केली. या वेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भुवनेश्‍वर बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन डॉ. विनोद वानखेडे, पशुसंवर्धन आयुक्तालयाचे डॉ. पवार, सरपंच सुवर्णा वानखेडे, शेलू (बाजार) पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. नागरे, डॉ. श्रीमती थोरात व डॉ. गणेश यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com