
केडगाव, जि. पुणे ः दापोडी (ता. दौंड) येथे पिसाळलेले कुत्रे चावल्याने (Stray Dog Bite) निर्माण झालेल्या संसर्गामुळे १२ गायींचा मृत्यू (Cow Death) झाला आहे. पशुधन दगावल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. महिनाभरापूर्वी दापोडी गावात पिसाळलेले कुत्रे आले होते. त्याने काही गायींना चावा घेतला होता.
काही ग्रामस्थांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारले. मात्र त्यानंतर दंश झालेल्या व संसर्गाने गायींचे आरोग्य बिघडले. अशा गायींमध्ये थरथर कापणे, खाणे बंद होणे, ओरडणे, पोटात दुखणे, तोंडाला फेस येणे अशी लक्षणे आहेत. लक्षणे सुरू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये गायींचा मृत्यू होत आहे.
मृत्यू झालेल्या गायींमध्ये गाफण, वासरे, दुभत्या गायींचा समावेश आहे. या बाबत नानगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी जोशी यांनी आजाराची शक्यता नाकारली आहे. ते म्हणाले, ‘‘रेबीजमुळे गायींचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांमध्ये रेबीजची लक्षणे आढळली आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यात आले आहे. ज्या गोठ्यातील गायी दगावल्या आहेत तेथील अन्य जनावरांचे लसीकरण केले आहे.
जनावरांच्या आरोग्यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.’’केडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चैत्राली आव्हाड म्हणाल्या, ‘‘स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी घरच्या श्वान व मांजरीचे रेबीज लसीकरण दरवर्षी करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात रेबीज लसीकरणाचे प्रमाण फार कमी आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.