सांगलीतील पशुसंवर्धन विभागात दोनशे पदे रिक्त

गेल्या काही दिवसांपासून ‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाला काही अंशी यश आले आहे.
Department Of Animal Husbandry
Department Of Animal HusbandryAgrowon

सांगली ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ‘लम्पी स्कीन’ रोगाचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) वाढत असल्याचे चित्र आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाला (Department Of Animal Husbandry) काही अंशी यश आले आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील १५३ पदे, तर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील ७९ पदे, अशी २३१ पदे रिक्त आहेत. परिणामी, अपुऱ्या मनुष्यबळावर लसीकरण (Lumpy Vaccination) करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

Department Of Animal Husbandry
Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराबाबत जालन्यात नियंत्रित क्षेत्र घोषित

जिल्‍ह्यातील शेतकरी पशुधनाचा पूरक व्यवसाय करतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागला जातो. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे १०२ आणि राज्य शासनाचे ५१ असे एकूण ४२३ पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने आहेत. जिल्ह्यातील पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या असणाऱ्या दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झाला.

Department Of Animal Husbandry
Lumpy skin : लम्पी स्कीन’ आजाराने ५११ गावे बाधित घोषित

प्रारंभी वाळवा तालुक्यात या आजाराने शिरकाव केला. नंतर मिरज आणि पलूस तालुक्यात जनावरे बाधित झाली आहेत. पशुसंवर्धन विभाग सतर्क होऊन बाधित जनावरांना लसीकरण केले. तसेच बाधित गावापासून पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांना लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे बाधित जनावरे बरी झाली आहे. अर्थात, पशुसंवर्धन विभागाला काही अंशी यश मिळाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, जिल्‍हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागात १५३ पदे आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडील ७९ अशी एकूण २३१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ज्या भागात प्रादुर्भाव झाला आहे, त्या भागात संपूर्ण यंत्रणा काम करत असल्याचे चित्र आहे. रिक्त पदांमुळे जनावरांना लसीकरण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढ असल्याने पशुपालकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील पशुधन

गाय-बैल ः ३ लाख २४ हजार ७५६

म्हैस ः ४ लाख ९३ हजार ९९८

शेळी ः ४ लाख ५४ हजार १२५

मेंढ्या ः १ लाख ३० हजार ७५४

...

जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदावर दृष्टिक्षेप

पदाचे नाव.... मंजूर पदे ... कार्यरत पदे ... रिक्त पदे

पशुधन विकास अधिकारी...८५...४२...४३

सहा पशुधन विकास अधिकारी...१६...१४...२

पशुधन पर्यवेक्षक...६२...३३...२९

कनिष्ठ सहायक...२...१...१

वर्णोचार...६३...३०...३३

परिचर...१५८...११३...४५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com