जनावरांना द्या ‘या’ औषधी वनस्पती!

प्रौढ जनावरांना सर्दी आणि खोकल्याची बाधा झाल्यास वेळीच उपचार न केल्यास, दूध उत्पादनात घट दिसून येते.
Medicinal Plants In Animals Disease
Medicinal Plants In Animals DiseaseAgrowon

दूध उत्पादनात (milk production) सातत्य टिकवून ठेवण्यासाठी बदलणाऱ्या हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे. दूध उत्पादनाचा अगदी जवळचा संबंध जनावरांच्या आरोग्याशी असतो.

पावसाळ्यात जनावरांना सर्दी आणि खोकल्याची बाधा झाल्याचे अनेकदा पाहण्यात येते. किरकोळ वाटणारे हे आजार, वेळेत उपचार न केल्यास त्याची तीव्रता वाढते. जनावरांच्या शरीरावर ताण आल्यास, दूध उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते. श्वसनसंस्थेच्या आजारांमध्ये निवडक औषधी वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो.

Medicinal Plants In Animals Disease
कोंबड्यांना होतात हे संसर्गजन्य आजार !

श्वसन संस्थेच्या आजारावर अडुळसा या वनस्पतीची मुळे, पाने, फुले आणि फळे यांचा औषध म्हणून वापर केला जातो. कफ पातळ करण्यासाठी, खोकल्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अडुळसाचा वापर केला जातो. या वनस्पतीची पाने व मूळ औषधीमध्ये वापरावे.

अडुळसासोबतच श्‍वसनसंस्थेच्या आजारात तुळशीची पाने किंवा बी वापरले जातात. तुळशीचा वापर कफज्वरमध्ये केला जातो. तुळशीमुळे कफ पातळ होऊन आजार कमी होण्यास मदत होते.

Medicinal Plants In Animals Disease
पावसाळ्यात असे टाळा खुरांचे आजार !

श्‍वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत गुणकारी अशी कंटकारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीस रिंगणी किंवा भुईरिंगणी असे म्हटले जाते. या वनस्पतीचे सर्व भाग म्हणजे मूळ, खोड, पान, फळ औषधीमध्ये वापरले जातात.

काळी मिरी - या वनस्पतीचे फळ म्हणजेच मिरे. मिऱ्याचा वापर आपण पचनसंस्थेच्या आजारात करतो.

अद्रक - अद्रक हे पाचक आणि कंठाला हितकारक असते. अद्रकचा वापर खोकला, कफवर फायदेशीर ठरतो. आल्याचा किंवा सुंठाचा वापर श्‍वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत गुणकारक ठरतो. सुंठाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ओला अद्रक वापरल्यास अधिक प्रभावी ठरते.

Medicinal Plants In Animals Disease
दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन

सर्दी, खोकला यांसारख्या जनावरांच्या आजारावर उपचार करताना एका भांड्यात पाणी गरम करून घ्यावे. त्यात पाच ते दहा थेंब निलगिरी तेल घ्यावे. या तेलात तीन ते पाच ग्रॅम कापूर आणि तीन ते पाच ग्रॅम पुदिना टाकावा. या मिश्रणाची वाफ आजारी जनावरास द्यावी. असे केल्याने जनावराला झालेली सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. वाफ देत असताना त्या पाण्यात जनावरे तोंड घालणार नाहीत याची काळजी घ्यावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com