Lumpy Skin : औरंगाबादेत ९४ हजार जनावरांचे लसीकरण

औरंगाबाद जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार गाय वर्गीय जनावरांची संख्या ५ लाख ३४ हजार ३९४ इतकी आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ७४ गावात ३७१ जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

औरंगाबाद : जिल्ह्यात आजपर्यंत नऊ तालुक्यातील ७४ गावात जनावरांच्या ‘लम्पी स्कीन’ आजाराने (Lumpy Skin Disease) शिरकाव केला आहे. जिल्ह्यात ९४ हजार ९२६ गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण (Lumpy Skin Vaccination) करण्यात आले असून गाय वर्गीय जनावरांच्या सरसकट लसीकरणाचे (Livestock Vaccination) काम हाती घेतले जाणार, असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून (Department Of Animal Husbandry) देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार गाय वर्गीय जनावरांची संख्या ५ लाख ३४ हजार ३९४ इतकी आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ७४ गावात ३७१ जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. जवळपास २ लाख १० हजार ४६८ जनावरांना लसीकरणाची गरज असून ९४९२६ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : स्वतः जगातून गेली पण वासराला जगवलं

आजाराची लागण झाल्यानंतर केलेल्या उपचारांमुळे १९९ जनावर बरे झाले असून १७२ जनावरांवर उपचार सुरू आहेत. विविध तालुक्यातील ८ जनावरांचा ‘लम्पी स्कीन’ आजारामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ३ लाख ५५ हजार लस मात्र उपलब्ध असून वरिष्ठ पातळीवरील निर्णयानुसार जिल्ह्यात गायबर्गीय सर्वच जनावरांना लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार, असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी दिली.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी’ लसीकरणासाठी प्रति जनावरामागे २० रुपये आकारणी

‘लम्पी स्कीन’आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यकता यंत्रणेची मदतही घेतली जाणार आहे. पशुपालकांनी आजारी जनावरांवर लक्ष ठेवून त्यांचे विलगीकरण व वैद्यकामार्फत उपचाराची प्रक्रिया तातडीने करण्याची सूचनाही डॉ. झोड यांनी केली.

तालुकानिहाय गाय वर्गीय पशूंची संख्या(२० व्या जनगणनेनुसार)

औरंगाबाद ६३६६६

फुलंब्री ५६,५३३

सिल्लोड ७१३१०

सोयगाव २३ हजार २६५

कन्नड ८६ हजार ३२

खुलताबाद २८ हजार ७८०

गंगापूर ६२,३०२

वैजापूर ७० हजार २१६

पैठण ७२ हजार २९०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com