Animal Vaccination
Animal VaccinationAgrowon

एक कोटी ६८ लाख जनावरांना लाळ्या खुरकुताचे लसीकरण

नगर ः पावसाळ्याच्या आधी जनावरांना दिल्या जाणाऱ्या लाळ्या-खुरकुताच्या (Foot And Mouth Diseases)लसीकरणात (FMD Vaccination) सर्वच जिल्ह्यांत आघाडी घेतलेली आहे. डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत राज्यातील १ कोटी ६८ लाख जनावरांना लसीकरण (Animal Vaccination) झाले आहे. ज्या जिल्ह्यांत सहा महिन्यांपूर्वी लसीकरण झाले. त्या जिल्ह्यात आता जूनपासून पुन्हा नव्याने लसीकरण सुरू होणार आहे.

राज्यात गाय-म्हैस वर्गातील १ कोटी ९५ लाख ९६ हजार जनावरे आहे. साधारणपणे थंडीच्या काळात लाळ्या-खरकुताचा जनावरांना प्रादुर्भाव होत असल्याने दरवर्षी साधारण सहा महिन्यांनी एकदा लाळ्या-खुरकुताचे लसीकरण केले जाते. मागील वर्षी हे लसीकरण करण्याला अडचणी आल्या होत्या. आतापर्यंत राज्यातील सर्वच भागांत साधारणपणे एकाचवेळी लसीकरण केले जात होते. मात्र गेल्या वर्षी राज्यात लसीची पुरवठा एकाच कंपनीकडून केला जात आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांत एकाचवेळी लसी मिळाल्या नसल्याने टप्प्याटप्प्याने लसीकरण झाले.

नगर, बीड जिल्ह्यांत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत लसीकरण झाले. मागील सहा महिन्यांचा विचार केला, तर आतापर्यंत एक कोटी ६८ लाख जनावरांना लसीकरण पूर्ण झाले आहे. ज्या जिल्ह्यात लसीकरणाला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला त्या जिल्ह्यांत आता जूनपासून लाळ्या खुरकुताचे लसीकरण सुरू केले जाणार आहे. राज्यात सर्वाधिक १६ लाख जनावरे नगर जिल्ह्यात असून, दूध उत्पादनातील मोठे गोठे आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्याबाबत अधिक काळजी घेतली जाते. पुणे जिल्ह्यात ११ लाख ४५ हजार, तर सोलापूर जिल्ह्यातही १२ लाख ४२ हजार पशुधनाची संख्या अधिक आहे.

आतापर्यंतचा विचार केला तर सहा महिन्यांत राज्यात १ कोटी ८० लाख २४ हजार ९५० लाळ्या खुरकूत लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. एकूण जनावरांच्या ९३ टक्के लसीकरण झाले आहे. जवळपास सहा लाख लसी वाया गेल्या आहेत. तर साडेसहा लाख लसी शिल्लक आहेत असे सांगण्यात आले.

जिल्हानिहाय जनावरांची संख्या
मुंबई ः २७६१४, ठाणे ः १७२०४३, पालघर ः ३०८६३७, रायगड ः २३९१३१, रत्नागिरी ः २७६१७२, सिंधुदुर्ग ः १५७२५४, नाशिक ः ११,१६,२८४, धुळे ः ४५२२०३, नंदुरबार ः ३७८२७१, जळगाव ः ८४६४०७, नगरर ः १५,९९,६५८, पुणे ः ११,४४,८९३, सातारा ः ७७९३३२, सांगली ः ८,१८,७५४, सोलापूर ः १२,४१,८५८, कोल्हापुर ः ८,५२,५२१, औरंगाबाद ः ६,३३,००२, जालना ः ५,०४,०४८, परभणी ः ३,९८,३५६, बीड ः ७,५४,८०८, लातुर ः ५,१४,६५५, उस्मानाबाद ः ५,५०,८६८, नांदेड ः ७,३८,८१४, हिंगोली ः ३,०६,३२८, अमरावती ः ५९४५९४, अकोला ः २,८३,०६८, वाशीम ः २,२१,९१७, बुलडाणा ः ५,९५,६७७, यवतमाळ ः ६,८४,४९७, नागपूर ः ४,९१,०३०, वर्धा ः ३,२२,५२९, भंडारा ः ३,१९,८९७, गोंदिया ः ३,८५,१५४, चंद्रपूर ः ४,५९,९५२, गडचिरोली ः ५,२५,७३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com