दुधातील फॅट कमी का होते ?

आपल्याकडे सर्वसाधारणपणे गायीच्या दुधात ३.५ टक्के फॅट तर म्हशीच्या दुधात ५ टक्के फॅट प्रमाणित धरले जाते.
milk
milkAgrowon

दुधात असणाऱ्या विविध घटकापैकी स्निग्धांश (fat) हा दुधाच्या प्रतवारीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे गायीच्या दुधात (cow milk) ३.५ टक्के फॅट तर म्हशीच्या दुधात (buffalo milk) ५ टक्के फॅट प्रमाणित धरले जाते. परंतु काहीवेळेस दुधातील फॅटचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.

त्या मागची विविध कारणे आज आपण पाहूया.

जनावरांची आनुवंशिकता किंवा जात-
जनावरांची आनुवंशिकता किंवा जात स्निग्धांशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. दूध उत्पादनक्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जातात. जर्सी गायीच्या दुधातील फॅटचे प्रमाण पाच टक्के, तर हॉलस्टीयन फ्रिजीयन गायीच्या दुधात ३ ते ३.५ टक्के फॅट आढळून येते.

milk
दुधातील भेसळीचे प्रकार | Milk Adulteration | ॲग्रोवन

जनावरांचा आहार-
जनावरांना दिला जाणारा आहार संतुलित असणे गरजेचे आहे. आपल्याकडे उपलब्ध होणारा चाराच वर्षभर जनावरांना खाण्यास दिला जातो. जनावरांच्या आहारात ऊसाचा जास्त वापर केल्यास, जनावरांच्या आहारातील साखरेचे प्रमाण वाढून दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.

milk
धार काढताना या गोष्टींचे पालन करा! | Care while milking animals | ॲग्रोवन

दूध काढण्याच्या वेळेतील अंतर-
सर्वसाधारणपणे आपल्याकडे दिवसातून दोन वेळेस धार काढली जाते. दूध काढण्याच्या या दोन्ही वेळेचा दूध उत्पादन व फॅटशी खूप जवळचा संबंध असतो. दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त १२ तासांचे अंतर असावे. हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढते, पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.

धार काढण्याची पद्धत-
दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणपणे एक टक्का, तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत असते. त्यामुळे कासेतील पूर्ण दूध काढून घेण गरजेचं आहे.

जनावराचे वय व वेतांची संख्या-

जनावराचे वय जसजसे वाढते, तसतसे दुधातील फॅटचे प्रमाण कमी कमी होत जाते. सुरुवातीच्या वेतात फॅटचे प्रमाण जास्त मिळते. नंतर ते कमी होत असते. साधारणपणे सात ते आठ वेतानंतर दुधातील फॅटच्या प्रमाणात लक्षणीय घट होते.

वातावरणातील बदल-
पावसाळ्यात, हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक असल्याने जनावरांचे दूध उत्पादन वाढते. मात्र दुधातील फॅटचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. याउलट उन्हाळ्यामध्ये सुक्या चाऱ्याचा समावेश जास्त प्रमाणात केल्याने दुधातील फॅट वाढलेले दिसून येते.

दुधातील भेसळ-
दुधात केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे फॅटचे प्रमाण कमी होते. दुधात पाण्याची भेसळ केली असता, दुधातील घन घटकांचे प्रमाण कमी होते. तसेच, दुधाची भुकटी मिसळून भेसळ केली असता दूध घट्ट दिसते, पण फॅट कमी लागते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com