पावसाळ्यात जनावरांना पिण्यास द्या, निर्जंतुक पाणी !

दुधात जवळपास ८४ ते ८६ टक्के पाण्याचे प्रमाण असते. जनावरांना वेळोवेळी स्वच्छ, ताजे निर्जंतुक पाणी दिल्यास दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते.
पावसाळ्यात जनावरांना पिण्यास द्या, निर्जंतुक पाणी !
Water Management Of Animals In Rainy SeasonAgrowon

दुधात (milk) जवळपास ८४ ते ८६ टक्के पाण्याचे प्रमाण असते. जनावरांना वेळोवेळी स्वच्छ, ताजे निर्जंतुक पाणी दिल्यास दूध उत्पादनात (milk production) वाढ झालेली दिसून येते. जनावरांच्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन, दूध उत्पादनावर त्याच्या परिणाम झालेला दिसून येतो. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास, पचनक्रिया मंदावून, दूध देण्याचे प्रमाण जवळपास १० ते २० टक्क्यांनी घटते.

एका गायीला शारीरिक क्रियांसाठी दिवसाला सरासरी ३० ते ४० लिटर पाण्याची (water) गरज असते. दूध देणाऱ्या गायीला प्रती लिटर ४ ते ५ लिटर जास्त पाण्याची गरज पडते. दिवसाला १५ लिटर दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायीला ६० लिटर पाणी फक्त दूध उत्पादनासाठी लागते.

Water Management Of Animals In Rainy Season
शेळीचे दूध पचायला हलके का असते ?

पावसाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी पावसाळ्यात जनावरांचे पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात बरेचदा जनावरे रस्त्याच्या बाजूला खड्ड्यातील किंवा इतर ठिकाणी साचलेले पाणी पितात. असे पाणी पिल्याने जनावरांना विविध रोगांची लागण होण्याची शक्यता असते. जनावरांना पावसाळ्यात नेहमी स्वच्छ, निर्जंतुक पाण्याचा पुरवठा केला पाहिजे.

Water Management Of Animals In Rainy Season
निर्जंतुक दूध म्हणजे काय?

पावसाळ्यात विशेषकरून जनावरांच्या पाणी पिण्याच्या टाक्यांमध्ये पावसाचे वाहत आलेले पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्याआधी पाण्याच्या टाकीला चुन्याचा थर मारून घ्यावा.

पावसाळ्यात नवजात वासराची विशेष काळजी घावी. नवजात वासरांना कोरड्या, उबदार ठिकाणी ठेवावे. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्याने जनावरांना कासेचे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे धार काढण्यापूर्वी आणि धार काढल्यानंतर सड टीट डीपमध्ये बुडवून घ्यावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com