जनावरांना क्षारांची आवश्यकता का असते?

शरीराच्या उत्तम निरोगी वाढीसाठी जनावरांना संतुलित आहाराचा पुरवठा करणे गरजेचं आहे. संतुलित आहारातून जनावरांच्या सर्व गरजा भागविल्या गेल्या पाहिजेत. जनावरांच्या शरीराच्या निरोगी वाढीसाठी क्षार-मिश्रणे महत्त्वाची भूमिका बजावतात.
जनावरांना क्षारांची आवश्यकता का असते?
Importance Of Mineral Mixture In Dairy AnimalsAgrowon

शरीराच्या उत्तम निरोगी वाढीसाठी जनावरांना संतुलित आहाराचा (balance feed) पुरवठा करणे गरजेचं आहे. संतुलित आहारातून जनावरांच्या सर्व गरजा भागविल्या गेल्या पाहिजेत. जनावरांच्या शरीराच्या निरोगी वाढीसाठी क्षार-मिश्रणे (mineral mixture) महत्त्वाची भूमिका बजावतात. काही क्षार जनावरांच्या शरीरात तयार होत नाहीत. जनावरांच्या शरीरातील सर्व क्रिया, शरीरातील संप्रेरकांचे (Hormones) कार्य, पाचक स्त्राव आणि विकारांचे (enzymes) कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी क्षारांची गरज असते.

भौगोलिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणच्या मातीमध्ये विशिष्ट मुलद्र्व्याची कमतरता दिसून येते. मातीतील मुलद्र्व्याची कमतरता चाऱ्यातही राहते. ही प्रदेशानिहाय कमतरता भरून काढण्यासाठी जनावरांच्या आहारात क्षारांचा समावेश गरजेचा आहे.

Importance Of Mineral Mixture In Dairy Animals
जनावरांना द्या चिलेटेड खनिजे!

जनावरांना वाढीच्या काळात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि स्फुरद या क्षारांची आवश्यकता जास्त असते. जनावरांच्या आहारात कॅल्शियम आणि स्फुरदचे प्रमाण २:१ असले पाहिजे. कॅल्शियम, सोडियम, आयोडीन, जस्त, मँगनीज आणि लोह या क्षारांच्या कमतरतेमुळे जनावरे माजावर येत नाहीत. मुका माज दाखविण्याचे प्रमाण वाढते. तसेच त्यांच्यामध्ये तात्पुरता वांझपणा येतो.

Importance Of Mineral Mixture In Dairy Animals
जनावरांच्या आहारात असावीत योग्य चिलेटेड खनिज मिश्रणे

गायीच्या दुधामध्ये ०.७ ते ०.८ टक्के क्षारांचे प्रमाण असते. दुधाळ जनावरांमध्ये दुधाच्या माध्यमातूनही क्षार घटक शरीराबाहेर जात असतात. त्यामुळे दुधाळ जनावरांची क्षारांची गरज शरीरपोषणाव्यतिरिक्त दुधासाठीही असते.

जनावरांच्या शरीरात कॅल्शियमची गरज ही, हाडांची वाढ, मांस पेशींच्या संतुलनासाठी गरजेची असते. कॅल्शियमचे सर्वात जास्त म्हणजे ९९ टक्के प्रमाण हे शरीरातील हाडे आणि दातांमध्ये असते. उर्वरित एक टक्का शरीरातील इतर पेशी आणि पेशी द्रव्यामध्ये असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. कॅल्शियमच्या अभावी लहान वासरांमध्ये मुडदूस नावाचा रोग होतो. दुधाळ जनावरांमध्ये व्यायल्यानंतर मिल्क फिव्हर दिसून येतो.

फॉस्फोरस शरीरातील पिष्टमय पदार्थांचे पचन आणि ऊर्जानिर्मितीसाठी आवश्यक असते. सोबतच प्रथिनांच्या विघटनासाठीही गरजेचं असते. जनावरांच्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फोरसचे प्रमाण २:१ ते ६:१ या प्रमाणात असणे आवश्यक आहे.

आहारातील क्षार-मिश्रणाचे प्रमाण कमी असले तरी, ते टाळून चालणार नाहीत. यातली काही क्षार-मिश्रणे जनावरांच्या विविध शरीर क्रियांमधून सतत बाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांचा आहारातून पुरवठा करणेही तितकेच गरजेचं आहे. जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण योग्य प्रमाणात दिल्यास जनावरांची वाढ चांगली होते. जनावरे वेळेवर माजावर येतात. दूध उत्पादनात सातत्य राहून आजारांचे प्रमाण कमी होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com