Dysentery dairy cattle: वासरातील हगवणीची कारणे काय असतात?

वासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा सर्वात महत्वाचा आजार म्हणजे हगवण. या आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यांच्या वाढीवर, आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो.
Calf Dysentery
Calf DysenteryAgrowon

वासरांच्या संगोपनावर दुग्धव्यवसायाचे यश अवलंबून असते. दुभत्या जनावरांमध्ये वासरांचा मृत्यू झाल्यास काही प्रमाणात दूध उत्पादनात घट येते. आर्थिक नुकसान होते. वासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा सर्वात महत्वाचा आजार म्हणजे हगवण (Calf Dysentery). या आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यांच्या वाढीवर, आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. हे ओळखून तातडीने उपचार करावेत. पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी वासरांतील हगवणी विषयी पुढील माहिती दिली आहे.

Calf Dysentery
वासरातील आजारावर उपाययोजना

वासरांतील हगवणीची कारणे काय आहेत?

- एकावेळी जास्त प्रमाणात चीक किंवा दूध पाजणे, ई कोलाय, सालमोनेलोसिस, जंत, कॉक्सिडीया या रोगांच्या प्रादुर्भावामुळे आणि गोठ्यातील अस्वच्छतेमुळे वासरांना हगवण लागते.

- वासरांची विष्ठा पातळ, पांढरी/रक्तमिश्रित किंवा हिरवट असते. सतत पातळ विष्ठेमुळे शरीरातील पाणी कमी होते. वासरू अशक्त व मलूल बनते.

- वासरु दूध पीत नाही. चारा कमी खाते किंवा चारा खाणे पूर्णपणे बंद होते.

- पोटातील वेदनेमुळे पोटावर पाय मारणे, दात खाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

Calf Dysentery
Animal Care : जनावरांतील विषबाधेची कारणे कोणती आहेत?

उपाययोजना काय कराव्यात?

योग्य निदान करूनच उपचार व योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते.

वासरू एकावेळी किती चीक किंवा दूध पिते याचे निरीक्षण करावे. चीक किंवा दूध जास्त होत असल्यास जास्त चीक/दूध एकाच वेळी पाजू नये.

- दूध पाजण्यासाठीची भांडी स्वच्छ असावीत. गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी.

- रक्तमिश्रित हगवण असेल, तर वासरांची विष्ठा तपासून कॉक्सिडिया प्रतिबंधासाठी गोठ्यात स्वच्छता राखावी. गोठा कोरडा राहील यांची काळजी घ्यावी.

- कॉक्सिडीयावर उपचारासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. पांढरी हगवण सर्वसाधारणपणे जंतुप्रादुर्भावामुळे होते. योग्यनिदान करून उपचार करून घ्यावेत हागवणीमध्ये शरीरातील पाण्याचे, इलोक्ट्रोलाइट्‌सचे संतुलन बिघडते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com