
मारवेल (Marvel Fodder) हे गवतवर्गीय चारा पिक आहे. मारवेल गवतामुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत होते. पाण्याची उपलब्धता असेलल्या भागात मारवेल गवताची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. काही ठिकाणी मारवेल गवताची लागवड शेताच्या बांधावरही केली जाते. मारवेल गवताची लागवड एकदा केल्यास सलग ४ ते ५ वर्षे उत्पादन मिळते. जनावरांना वर्षभर हिरवा चारा देण्यास्तही मारवेल गवताची लागवड करावी. या गवताला कांडी गवत असेही म्हणतात.
मारवेल गवताच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन चांगली असते. पिकाच्या वाढीसाठी उष्ण व दमट वातावरण पोषक असते. सरासरी ३० ते ३१ अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होते. सुरुवातीचा पाऊस झाल्यानंतर जमिनीत वाफसा स्थिती निर्माण झाल्यानंतर या पिकाची लागवड करावी.
लागवडीसाठी एकरी १५ ते २० हजार ठोंब्यांची गरज पडते. चारा उत्पादनासाठी नवीन लागवड जून-जुलै महिन्यात केली जाते. लागवड करताना ठोंबे ४५ × ३० सेंटीमीटर अंतरावर लावावेत.
चारा उत्पादनासाठी पारंपरिक वाणांचा वापर केल्यास पुरेस उत्पादन मिळत नाही. सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. यासाठी फुले मारवेल-०६-४०, फुले मारवेल-०१ या जातीची लागवड करावी.
जिरायती मध्ये किमान दोन कापण्या घेऊ शकता. बागायती क्षेत्र असल्यास वर्षभरात ६ ते ८ कापण्या घेऊ शकता. जिरायती मध्ये मारवेल पिकापासून एका वर्षामध्ये हेक्टरी ३५० ते ४०० क्विंटल चारा उत्पादन मिळते.
बहुवार्षिक पिकांची एकदा लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्षे नियमित चाऱ्याचे उत्पादन मिळते. त्यामुळे शेतातील नांगरणी, कोळपणी यांसारख्या मशागतीच्या हंगामी कामांवरच्या खर्चामध्ये बचत होते. हंगामी पिकांमध्ये जसा खर्च करावा लागतो, तसा बहुवार्षिक चारा (multicut fodder) पिकांसाठी करावा लागत नसल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.