जमिनीची धूप रोखण्यासाठी पॅरा गवताची लागवड

दुधाळ जनावरांना वर्षभर हिरवा चारा देण्यासाठी हिरव्या चाऱ्याचे नियोजन आवश्यक आहे. जनावरांच्या आहारात विविध प्रकारचा एकद्ल आणि द्विदल चारा असला पाहिजे.
Para Grass Fodder Cultivation
Para Grass Fodder CultivationAgrowon

खरिपातील पिक हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जास्तीच्या पावसाच्या पाण्याने जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात होत असते. जमिनीची धूप रोखण्यासाठी पॅरा गवताची (Para grass) लागवड केल्यास चांगला फायदा दिसून येतो. पॅरा गवताचा वापर जनावरांसाठी हिरवा चारा (green fodder) म्हणूनही करता येतो.

चांगल्या प्रतीचा चारा मिळण्यासाठी चारा पिक लागवडीचे नियोजन करणे गरजेचं आहे. यामध्ये योग्य चारा पिकांची निवड, जमिनीचा पोत, पाण्याची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन गरजेचं आहे.

Para Grass Fodder Cultivation
जनावरांसाठी ज्वारीचा चारा !

पॅरागवत बहुवार्षिक एकदल चारा पिक आहे. दमट हवामानात आणि सर्व प्रकारच्या जमिनीत वाढ चांगली होते. पॅरागवताची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून आणि जुलैमध्ये करावी. जास्त थंडीमध्ये या गवताची वाढ खुंटते. पॅरा गवताच्या लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून घ्यावी. सोबतच पेरणीपूर्वी दोन वखरणी करून घ्याव्यात.

Para Grass Fodder Cultivation
जनावरांना द्या विविध प्रकारचा पौष्टिक चारा

सरासरी उंची १७०-१९० सें.मी. वाढते. सुरवातीला इतर चाऱ्यामध्ये मिसळून पॅरा गवत जनावरांना द्यावे. लागवड करताना एक हेक्टर जमिनीसाठी ७५००० ठोंब्यांची गरज पडते. लागवड ६० × ३० सेंटीमीटर अंतरावर करावी. या गवतामध्ये ७ टक्केपर्यंत प्रथिने, ०.७६ टक्के कॅल्शिअम, ०.४९ टक्के फॉस्फरस असते.

लागवड केल्यानंतर पॅरागवताची पहिली कापणी ६५ ते ७० दिवसांनी करावी. एकूण ७ ते ८ कापण्या मिळतात. या कापण्या ४० ते ४५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. एक हेक्टर क्षेत्रातून ९० ते १०० टन प्रती हेक्टरी चाऱ्याचे उत्पादन मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com