तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा गोठा आहे?

सर्वसाधारणपणे जनावरे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि स्वच्छ दुधाच्या उत्पादनासाठी जनावरांचा गोठा मोकळा, कोरडा असणे गरजेचं असते.
animal shed
animal shedAgrowon

सर्वसाधारणपणे जनावरे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि स्वच्छ दुधाच्या उत्पादनासाठी (clean milk production) जनावरांचा गोठा मोकळा, कोरडा असणे गरजेचं असते. जनावरांच्या गोठ्याचे दोन प्रकार येतात. एक म्हणजे मोकळ्या पद्धतीचा गोठा आणि दुसरा म्हणजे पारंपारिक पद्धतीचा गोठा.

पारंपारिक गोठा बांधायचा झाल्यास जास्त प्रमाणात खर्च येतो. या पद्धतीमध्ये जनावरांच्या वयानुसार, अवस्थेनुसार गोठ्याची आवश्यकता असते. यामध्ये गायीचा गोठा, गायी विण्यासाठीचा गोठा, आजारी जनावरांचा गोठा, बाहेरून नवीन विकत आणलेल्या जनावरांना ठेवण्यासाठीचा गोठा, वासरांचा गोठा, वळूचा गोठा, भाकड जनावरांचा गोठा, दूध दोहनाचा गोठा यांसारख्या गोठ्याच्या प्रकारांचा समावेश होतो

animal shed
जनावरांना किटोसीस होऊ नये म्हणून काय कराल? | Ketosis in Cow | ॲग्रोवन

आपल्याकडील जनावरांची संख्या १० पेक्षा कमी असल्यास एका ओळीचा गोठा चालू शकतो. मात्र जनावरांची संख्या १० पेक्षा जास्त असल्यास, दोन ओळींच्या गोठ्याची गरज पडते. या दोन ओळींवरून तोंडाकडे तोंड आणि शेपटाकडे शेपूट अशा दोन पद्धती येतात.

animal shed
या कारणामुळे गाय गाभण राहत नाही! | Repeat Breeding In Cow and Buffalo | ॲग्रोवन

शेपटाकडे शेपूट पद्धतीच्या गोठ्यामध्ये मधल्या भागाची रुंदी जास्त असते. ही रुंदी पाच ते सहा फुटापर्यंत असू शकते. या मधल्या भागामध्ये दोन्ही बाजूकडून उतार असतो. त्यामुळे गोठा धुताना दोन्ही बाजूचे पाणी मध्ये येऊन बाहेर जाते. जनावरे उभे राहण्याच्या जागेची लांबी सहा फुट असते. तर रुंदी चार फुट असते. जनावरे उभे राहण्याच्या जागेला एक इंचाचा उतार द्यावा. जनावरे उभे राहण्याच्या दोन्ही बाजूस गव्हाणी असतात. गव्हाणीची रुंदी दोन फुट आणि खोली अर्धा फुट ठेवावी. या पद्धतीच्या गोठ्यामध्ये जनावरांचा गोठा स्वच्छ करणे सोपे ठरते. जनावरांना बाहेरून ताजी मोकळी हवा मिळते. माजावर आलेली जनावरे ओळखणे सोप्पे जाते.

तोंडाकडे तोंड असलेल्या पद्धतीमध्ये गोठ्याच्या मध्यभागी गव्हाणी असतात. गटारीवर सूर्यप्रकाश पडल्याने, रोग जंतूची वाढ होत नाही. जनावरांना चारा टाकणे सोयीस्कर जाते.
जनावरांचे थंडी, ऊन, वारा आणि पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी निवाऱ्याची आवश्यकता असते. गोठ्यात जनावरांना स्वच्छ, आरामदायी वातावरण देणंही तितकंच गरजेचं असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com