
दुधात असणाऱ्या विविध घटकांच्या संतुलित प्रमाणामुळे दुधाला पूर्णान्न (complete food) म्हंटले जाते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण आपल्या आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ घेत असतात.
दुधात असणाऱ्या अनेक घटकांमध्ये फॅट (Fat), सॉलिड नॉट फॅट (Solid Not Fat), दुग्ध शर्करा (Milk Sugar-Lactose) म्हणजेच लॅक्टोज, मिनरल्स यांसारखे घटक असतात. दुधात कशाचीही भेसळ केल्याने सर्वप्रथम दुधातील फॅटवर परिणाम दिसून येतात.
आपल्याकडे दुधाला दिली जाणारी किंमत ही दुधातील फॅटच्या प्रमाणावरून ठरवली जाते. बहुतांश ठिकाणी दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी दुधात पाण्याची भेसळ केली जाते. दुधात पाणी टाकल्याने दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते. दुधातील फॅट विरहीत घटकांचे प्रमाणही कमी होते. पाण्याची घनता दुधाच्या घनतेपेक्षा कमी असल्याने दुधाची एकूण घनताही कमी झालेली दिसून येते. कमी झालेली घनता लॅक्टोमीटरचा वापर करून काढता येते. तसेच दुधाच्या गोठण बिंदूवरून पाण्याची भेसळ ओळखणे शक्य आहे.
दुधातील मलई, म्हणजे साय काढून टाकल्यानंतर त्यातील स्निग्धांशांचे प्रमाण कमी होते. मात्र एस.एन.एफचे प्रमाण वाढते.
साय काढून टाकल्यास, पाणी मिसळल्यास फॅटचे प्रमाण अजून कमी होते. या दुधात स्टार्च किंवा साखर मिसळली जाते. पाणी टाकल्याने दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते. मात्र एस.एन.एफचे प्रमाण तेवढेच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास टोटल सॉलिडचे प्रमाण वाढते. याशिवाय साखर टाकल्यामुळे दुधाला गोड चव येते.
काहीवेळेस दुधाची शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी दुधात रासायनिक घटक मिसळले जातात. हे रासायनिक घटक मानवी आरोग्यासाठी अपायकारक असतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.