असा टाळा, गायीमधील गर्भपात !

गर्भपात हा मादी जनावरांमध्ये दिसून येणारा आजार आहे. हा जीवाणूमुळे होणारा रोग असून सर्व वयोगटातील मादी जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येतो.
असा टाळा, गायीमधील गर्भपात !
Brucellosis In CowAgrowon

साधारणपणे प्रजननसंस्थेचे (Reproduction) आजार हे नर आणि मादी दोन्ही जनावरांमध्ये दिसून येतात. पण गर्भपात (Abortion) हा मादी जनावरांमध्ये दिसून येणारा आजार आहे. हा जीवाणूमुळे होणारा रोग असून सर्व वयोगटातील मादी जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येतो. या आजारात मरतुकीचे प्रमाण अत्यंत कमी असले तरी जनावरांमध्ये प्रजननाच्या समस्या दिसून येतात.

आपल्याकडे पशुपालन हे दूध उत्पादनासाठी (Milk Production) केले जाते. प्रत्येक वेतात दूध उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत असतो. वेत देण्यासाठी जनावरांनी गाभण राहून गोठ्यात वासराचा जन्म झाला पाहिजे. ब्रुसेलोसिस (Brucellosis) या आजारात जनावरांची प्रजजन क्षमताच ढासळते.
बाधित जनावरांच्या संपर्कात आल्यानंतर गाभण जनावरांना या रोगाची बाधा होत असते. गर्भपात झालेल्या जनावरांचे रक्त किंवा इतर स्त्राव निरोगी जनावरांच्या संपर्कात आल्याने त्यांचा गर्भपात होऊ शकतो.

Brucellosis In Cow
पावसाळ्यात असे टाळा खुरांचे आजार !

जनावरांमध्ये गर्भपात होण्याची अनेक कारणे असतात. ब्रुसेलोसिस हे त्यापैकी एक. यामध्ये गाभण गायी-म्हशींचा गर्भ चार ते नऊ महिन्याचा असताना, तर शेळ्या-मेंढ्यांचा गर्भ २ ते ५ महिन्याचा असताना गर्भपात झालेला दिसून येतो. जनावरांच्या गर्भाशयाला संसर्ग होतो. गर्भपात झाल्याने वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. जनावरांच्या दूध उत्पादनात घट झालेली दिसून येते. गर्भाशयाला संसर्ग झाल्याने, जनावरांमध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांझपणा (Infertility) येण्याची शक्यता असते.

Brucellosis In Cow
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?

आपल्या गोठ्यातील जनावरांचा गर्भपात बृसेला नावाच्या जीवाणूमुळे होऊ नये म्हणून मादी वासरांचे आयुष्यात एकदाच लसीकरण करून घ्यावे लागते. ब्रुसेला- अॅबॉर्टस स्ट्रेन -१९ (Brucella abortus Strain-19) ही लस मादी वासराला तीन ते सहा महिने वय असताना दिली जाते. हे वय निघून गेल्यास पुन्हा या रोगाविरुद्ध लसीकरण (Vaccination) करता येत नाही.
आपल्याकडील प्रत्येक जनावरांची किमान वर्षातून एकदा ब्रुसेलोसिससाठीची चाचणी करून घ्यावी. नैसर्गिक रेतनामध्ये जनावरांना प्रजननाचे विकार होण्याची शक्यता असते. यासाठी कृत्रिम रेतन हा चांगला पर्याय आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com