किती वेळा द्यावं उन्हाळ्यात जनावरांना पाणी?

जनावरांना दिले जाणारे पाणी स्वच्छ, ताजे आणि निर्जंतुक असल्यास जनावरे भरपूर पाणी पितात. परिणामी दूध उत्पादनातही वाढ झालेली दिसून येते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी पडल्यास पचन क्रिया मंदावते. दूध देण्याचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी घटते.
Water requirement of animal during summer season
Water requirement of animal during summer seasonAgrowon

स्वच्छ, ताजे पाणी जनावरांना वेळोवेळी दिल्यास दूध उत्पादनात (milk production) वाढ होऊन दुधाचा दर्जाही (milk quality) सुधारतो. पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील रक्ताचे (blood) प्रमाण कमी होऊन दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. रक्त घट्ट झाल्याने रक्ताभिसरण (blood circulation) क्रियेत अडथळा निर्माण होतो. पाणी कमी पडल्यास पचन क्रिया मंदावून दूध देण्याचे प्रमाण १० ते २० टक्क्यांनी घटते. जनावरांची प्रजनन (reproduction) क्षमता ढासळते.

पाण्याचे प्रमाण

- एका गायीला सरासरी दिवसाला ३० ते ४० लिटर पाण्याची शरीरासाठी आवश्यकता असते.
- गोठ्यातील इतर कामासाठी ६० ते ७० लिटर पाणी लागते.
- दूध देणाऱ्या गायीला प्रती लिटर ४ ते ५ लिटर जास्त पाणी लागते.
- प्रतिदिन १५ लिटर दूध देणाऱ्या गायीला ६० लिटर पाणी फक्त दूध उत्पादनासाठी लागते.

पाण्याची आवश्यकता

- प्रत्येक प्राण्याला पाण्याची गरज असते म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात.

- कोणीही पाण्याशिवाय जास्त काळ जगू शकणार नाही. पेशी सजीव राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

- रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

- शरीरामध्ये पाचक रस तयार होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

- शरीरातील दूषित घाण (मल, मुत्र, घाम) विसर्जनासाठी पाण्याची आवश्यकता असते.

- दूध तयार करण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.

- एक लिटर दूध तयार करण्यासाठी जवळपास ४ ते ५ लिटर पाण्याची आवश्यकता असते.

- एका वेळेला गाय पाणी प्यायली नाही तर २० ते ३० % दूध उत्पादनात घट होते.

- पाणी पिण्याचे प्रमाण वातावरणातील उष्णता, खाद्याचे प्रमाण,जनावराचे वय यांवर अवलंबून असते.

नेहमी स्वच्छ, ताजे पाणी पिण्यास द्यावे. ते मुबलक प्रमाणात असावे. जनावरांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचे तापमान खूप कमी किंवा जास्त नसावे. पाण्याचे तापमान १६ ते २६ अंश सेल्सिअस असावे. दिवसातून कमीत कमी तीन वेळेस पाणी पाजावे.उन्हाळ्यात दुभत्या जनावरांना पाणी दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चारवेळा विभागून दिल्यास जनावरे १५ ते २० टक्के अधिक दूध देतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com