कालवड भरविण्याचे योग्य वय कोणते ?

कालवड वयात आल्यावर ती दर २१ दिवसांनी स्पष्ट माजाची लक्षणे दाखवायला सुरुवात करते. वयानुसार योग्य वजनही असल्यास अशी कालवड प्रजननास योग्य असते.
 age and weight of heifer while calving
age and weight of heifer while calving agrowon-

कालवड (heifer) वयात आल्यावर ती दर २१ दिवसांनी स्पष्ट माजाची लक्षणे (heat symptoms) दाखवायला सुरुवात करते. वयानुसार योग्य वजनही असल्यास अशी कालवड प्रजननास योग्य असते. अशा कालवडीला कृत्रिमरीत्या पशुवैद्यकाच्या (veterinary doctor) सल्ल्याने भरवून घ्यावी. कालवडीचे वजन प्रौढ मादी जनावरांच्या वजनाच्या ६० ते ६५ टक्के झाल्यावर, ती पहिल्यांदा माजाची लक्षणे दाखविते.

होलेस्टीन फ्रिजीयन कालवडीचे वजन २८० ते ३०० किलो तर जर्सीचे वजन २५० ते २८० किलो झाल्यावर त्या पहिल्यांदा माजाची लक्षणे दाखवितात. पहिल्यांदा माजाची लक्षणे दाखविण्याचे वय गायी-म्हशींच्या जाती-प्रजातीनुसार बदलत असतो. काही कालवडी लवकर वयात येतात, तर काही उशिरा वयात येतात.

कालवड केव्हा भरवून घ्यावी ?

- कालवड वयात येणे जरी, वजनावर अवलंबून असले तरी वय १० ते १२ महिने झाल्यावर कालवडी माजाची लक्षणे दाखवायला सुरुवात करतात.

- व्यावसायिकदृष्ट्या पशुपालन करताना कालवडीचे वय १२ ते १४ महिने आणि प्रौढ वजनाच्या ६० ते ६५ टक्के वजन मिळाल्यावर, तिला भरवून घेतली पाहिजे.

- साधारणतः कालवड दर २१ दिवसांनी २ ते ३ वेळा माजाची लक्षणे दाखविल्यानंतर कालवडीला भरवून घ्यावे.

- पहिला किंवा दुसरा माज दाखविताना स्त्रीबीजकोशातून स्त्रीबीजांड तयार होत नाही. पहिल्यांदा कालवड भरवून घेताना लिंग निर्धारित वीर्यमात्रेचा वापर प्रभावी ठरतो.

कालवड दर २१ दिवसांनी अशी २ ते ३ वेळा माजावर येऊन गेल्यानंतर कृत्रिम रेतन करावे. अनेक वेळेस कालवडी विण्याचे वय हे १८ ते १९ महिने असेही दिसून आले आहे. परंतु लवकर गर्भधारणा झाल्यास विताना अडचण निर्माण होते. विल्यानंतर वार बाहेर पडत नाही. दुधाचे चांगले उत्पादन मिळत नाही. विल्यानंतर विविध आजारांना बळी पडते. कालवड विताना तिचा शरीर गुणांक ४ ते ४.२५ च्या दरम्यान असायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com