Poultry : परसातील कुक्कुटपालनासाठी कोणत्या कोंबड्या निवडाल?

सुधारित कोंबड्यांच्या जाती वापरून परसबागेतील उत्पन्न वाढविणे शक्य आहे.
Back yard Poultry
Back yard Poultry Agrowon

देशी कोंबड्याची अंडी (Egg) आणि मांस (Chicken) उत्पादनक्षमता सहसा कमी असते. परंतु सुधारित कोंबड्यांच्या जाती वापरून हे उत्पन्न वाढविणे शक्य आहे. परसातील कुक्कुटपालनासाठी (Back yard Poultry) हैदराबाद येथील कुक्कुटपालन प्रकल्प संचालनालयाने कोंबड्यांच्या विविध जाती विकसीत केल्या आहेत. या कोंबड्या अंडी आणि मांस अशा दुहेरी उत्पादनासाठी उपयुक्त आहेत.

Back yard Poultry
कुक्कुटपालन सुरु करताना या गोष्टी गरजेच्या

१) गिरीराज
- अंडी व मांस अशा दुहेरी उत्पादनासाठी या पक्ष्यांचा वापर केला जातो.
- २० ते २२ आठवड्यानंतर हे पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात.
- १०० ते ११० अंडी मिळू शकतात. पूर्ण वाढ झालेल्या नर पक्षाचे वजन ३ ते ३.५ किलो तर पूर्ण वाढ झालेल्या मादी पक्ष्याचे वजन २.५ ते ३ किलोपर्यंत भरते.


2) वनराजा
- उत्तम रोगप्रतिकारशक्ती आणि कमी खाद्यात जास्त उत्पादन देणारी ही जात आहे.
- विविध रंगाची पिसे असून दिसायला आकर्षक असतात.
- योग्य आहार व्यवस्थापन केल्यास नराचे ८ ते १० आठवड्याच्या वयात एक ते सव्वा किलो वजन मिळते.
- मादी एका वर्षात १६० ते १८० अंडी देऊ शकते.
- सामान्य रोगांच्या विरोधात उत्तम प्रतिकार क्षमता या जातींमध्ये दिसून येते.

३) ग्रामप्रिया
- १५ आठवड्यात १.२ ते १.५ किलो वजन मिळते.
- १६० ते १८० अंडी देण्याची क्षमता असून अंडी आकाराने मोठी ५७ ते ५९ ग्रॅम आणि तपकिरी रंगाची असतात.

४) श्रीनिधी
विविध रंगी पिसे आणि उत्तम रोग प्रतिकार क्षमता असलेली ही जात आहे. आकाराने मोठी ५३ ते ५५ ग्रॅम वजन असते.
- ६ आठवडयात ५०० ते ६०० ग्रॅम वजन मिळते. दरवर्षी सरासरी १४० ते १५० अंडी मिळतात.


५) हितकारी
या कोंबडीला उघड्या गळ्याची कोंबडी म्हणतात. कारण या कोंबडीच्या मानेच्या जागेवर पिसे नसतात. मान पूर्णतः उघडी असते. या कोंबड्या तुलनेने मोठ्या आकाराच्या आणि लांब मानेच्या असतात. नराची वयात आल्यानंतर उघडी त्वचा लाल रंगाची होते. २० आठवड्यांत शरीराचे वजन एक किलो पर्यंत भरते. वार्षिक सरासरी अंडी उत्पादन ९९ इतकं मिळतं.


६) स्वर्णधारा
स्वर्णधारा कोंबड्या एका वर्षात गिरीरीज कोंबडीपेक्षा १५-२० अंडी अधिक देतात. इतर स्थानिक जातींच्या तुलनेत त्यांची वाढ चांगली होते. गिरीराजा जातीच्या कोंबड्या तुलनेत आकाराने लहान आणि हलक्या वजनाच्या असतात. संगोपन अंडी आणि मांस अशा दोन्ही साठी करता येते. २२-२३ व्या आठवड्यात मादी अंदाजे ३ किलो वजनाची होते तर नर अंदाजे ४ किलो वजनाचे होतात. स्वर्णधारा कोंबड्या एका वर्षात अंदाजे १८०-१९० अंडी देतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com