वयानुसार वासरांचा असा बदला डायट!

मादी वासराचा जन्म झाल्यांनतर गोठ्यातच चांगली गाय तयार करण्यासाठी वाढत्या वयानुसार आहारात कोणते बदल केले पाहिजेत? कालवड तयार करताना येणारा खर्च जाणून घ्या.
with age change the feed of calf
with age change the feed of calf

चांगली, उच्च वंशावळीची गाय (cow) आपण आपल्या गोठ्यातच (shed) तयार करू शकतो. यासाठी मादी वासराचा (calf) जन्म झाल्यानंतर तिचं योग्य व्यवस्थापन (sangopn) महत्त्वाचे आहे. पण हे योग्य व्यवस्थापन नक्की कसं करायचं? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कोणताही नवीन जीव जन्माला आल्यानंतर दूध (milk) हे त्याचे प्रथम अन्न असते. वासराचा जन्म झाल्यानंतर आपण त्यांना खरंच चिकाच्या स्वरूपातील दूध देतो का? हा प्रश्न खरं तर प्रत्येक पशुपालकांनी स्वतःला विचारला पाहिजे. बर त्यापुढे जाऊन किती दिवस आपण वासराचे दुधावर संगोपन करू शकतो? आणि ते खरंच पशुपालकांना परवडू शकते का? बरं मग दूध बंद करताना काय खाद्य दिलं पाहिजे?

जसं आपण आपल्या घरातील लहान बाळाचं खाद्य त्याच्या वाढत्या वयानुसार बदलत असतो. तसंच असतं या वासराचं. वासराच्या वयानुसार, वाढीच्या अवस्थेनुसार आहार बदलावा लागतो किंबहुना तो बदल गरजेचा असतो. इथे आपले पशुपालक एक कॉमन प्रॅक्टिस फॉलो करताना दिसतात. ती अशी की, जे खाद्य ते गोठ्यातील इतर मोठ्या जनावरांना देतात, तेच खाद्य दुधात किंवा पाण्यात मिसळून वासरांनाही दिलं जाते.

तुम्ही जर अशा प्रकारे वासराचे संगोपन करत असाल आणि हे जर मादी वासरू असेल तर, पुढे जाऊन कसं बरं देईल जास्त दुधाचे उत्पादन ? तुम्हीच सांगा ..? असे हे खाद्य पातळ स्वरुपात वासरास दिल्यास ते रुमेनमध्ये न जाता अॅबोमासममध्ये जाते. रुमेनमध्ये गेलं नाही तर वासराची रवंथ करण्याची क्रिया लवकर सुरु होणार नाही. वाढत्या वयानुसार वासराची खाद्याची गरजसुद्धा वाढत असते. ही गरज भागविली नाही तर वासराची वाढ खुंटते. वाढीच्या वयानुसार आहारात काल्फ स्टार्टर, काल्फ ग्रोवर आणि काल्फ फिनिशर किंवा हिफर फीडचा समावेश करावा लागतो.

वासराला सुरुवातीच्या अवस्थेत जास्त प्रथिनं असलेला, पचण्यास सोपा असं खाद्य देतो यालाच आपण काल्फ स्टार्टर म्हणत असतो. जितकं चांगल्या प्रतीचं स्टार्टर फीड द्याल तितक्या लवकर वासराची रवंथ करण्याची प्रक्रिया सुरु होईल. वासराने रवंथ करायला सुरुवात केली की हळू-हळू दूध देण्याचे प्रमाण कमी करीत न्यावं. लहान वयातच चांगले खाद्य मिळाल्यास उत्तम रोगप्रतिकारशक्ती तयार होऊन, आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. सुदृढ, निरोगी गाय तयार होऊ शकते.

जन्मानंतर साधारणपणे पाचव्या दिवसापासून काल्फ स्टार्टर देण्यास सुरुवात करावी. वासरू अडीच महिन्याचे होईपर्यंत दीड ते दोन किलो काल्फ स्टार्टर दिवसभरात खाल्ल्यास दूध बंद करू शकता. कोणतं काल्फ स्टार्टर वासराला द्यावं?.. याबाबत अनेक संभ्रम दिसून येतात. तर हे खाद्य पेलेट किंवा गोळी स्वरूपातील असावे. आणि त्यातील प्रथिनांचे प्रमाण हे २४ टक्के असले पाहिजे. त्यातील पचनीय घटकांचे प्रमाण अधिक असावे. सोबतच त्याची चव आणि वासही आकर्षक असावा.

कालवडीला सातव्या महिन्यापासून काल्फ ग्रोवर सकाळी आणि संध्याकाळी असं मिळून दोन किलोपर्यंत द्यावे. कालवड वयात येऊन गाभण राहीपर्यंत हे खाद्य सुरु ठेवावे. यातील प्रोटीनचे प्रमाण २० ते २२ टक्क्यापर्यंत असले पाहिजे. कालवड दोन महिन्याची गाभण झाल्यानंतर ग्रोवर फीड देणं बंद करावं. हिफर पशुखाद्य हे प्रामुख्याने गाभण कालवडींसाठी बनविलेलं खाद्य असते. यातील प्रथिनांचे प्रमाण २० टक्क्यापर्यंत असते. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेलचं की वयाच्या वाढत्यानुसार प्रोटीनची गरज कमी होत जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com