जनावरांना द्या चिलेटेड खनिजे!

मानवी शरीराप्रमाणे जनावरांच्या शरीराला देखील दोन प्रकारच्या खनिजांची गरज असते. यामध्ये मायक्रो आणि मॅक्रो प्रकारातील खनिजे येतात.
Chelated Minerals For Animals
Chelated Minerals For AnimalsAgrowon

मानवी शरीराप्रमाणे जनावरांच्या शरीराला देखील दोन प्रकारच्या खनिजांची (Minerals) गरज असते. यामध्ये मायक्रो (Micro) आणि मॅक्रो (Macro) प्रकारातील खनिजे येतात. मोठ्या प्रमाणात लागणारी खनिजे म्हणजे मॅक्रो खनिजे होय. यात कॅल्शियम (Calcium), फॉस्फरस (Phosphorus), सल्फर (Sulfer), मॅग्नेशियम (Magnesium), सोडियम (Sodium), पोटॅशियम इ. खनिजे येतात. सूक्ष्म प्रमाणात लागणारी खनिजे मायक्रो खनिजे होय. यात झिंक, कोबाल्ट, मॅंगेनीज, कॉपर, आयर्न, आयोडीन, सेलेनिअम इ. खनिजांचा समावेश होतो

Chelated Minerals For Animals
जनावरांच्या आरोग्य समस्या

जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात दुधवाटे खनिजे बाहेर पडत असतात. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियमचा ह्रास मोठ्या प्रमाणात होत असतो. जनावरांच्या उत्तम निरोगी वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी (milk production), गर्भाच्या वाढीसाठी खनिजांची आवश्यकता असते. क्षारांच्या कमतरतेमुळे जनावरे वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. यासाठी जनावरांच्या आहारात क्षार मिश्राणांचा समावेश करण गरजेचं ठरत.

Chelated Minerals For Animals
..ही आहेत दुधातील आरोग्यदायी खनिजे

जनावरांना आपल्याकडे उपलब्ध होणारा विविध प्रकारचा चारा दिला जातो. चाऱ्यातील घटकांचे प्रमाण जमिनीची सुपीकता, पिकांना दिली जाणारी खते यानुसार बदलत असते. सर्वसाधारणपणे द्विदल चाऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पटकन वाढ होणाऱ्या हिरव्या कोवळ्या चाऱ्यात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असते. चारा कोरडा होत आला कि, त्यातील स्फुरदचे प्रमाण कमी होत जाते.

चिलेटेड खनिजे म्हणजे नेमकं काय?

यामध्ये एका खनिजाला दुसऱ्या प्रथिनाने किंवा अमिनो आम्लाने धरून ठेवले जाते. यामुळे शरीरासाठी आवश्यक प्रथिने शोषली जातात. खनिजांची रुमेनमधील स्थिरता त्यांचे प्रोटीनसोबत असलेल्या बॉन्डवर अवलंबून असते.

कोणत्याही खनिजाला चिलेटेड करणे म्हणजे, त्याचे रुपांतर सेंद्रिय रेणूमध्ये करणे होय. चांगल्या प्रतीच्या चिलेटेड खनिजावर कुठलयही प्रकारचा धन किंवा ऋण भार नसतो. याचमुळे ही खनिजे रुमेनमध्ये स्थिर राहतात. आतड्यामधून त्यांचे शरीरात शोषण केले जाते. जनावरांच्या शरीराला आवश्यक असणारी मिथीओनीन, लायसीन सारखे अमिनो आम्ले शरीरात लवकर शोषली जातात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com