Nagar Cow Death : शासन शेतकऱ्याला योग्य ती मदत करणार

लोहगावातील गायींच्या मृत्यूप्रकरणी पशुसवंर्धनमंत्र्यांची ग्वाही
Livestock
LivestockAgrowon

नगर : लोहगाव (ता. नेवासा) येथील जनार्दन ढेरे यांच्या गोठ्यातील सुमारे बावीस गायींचा मृत्यू (Cow Death) झाला. सहा दिवसानंतरही मृत्युसत्र सुरुच आहे. यामुळे ढेरे यांचे २० लाख रुपयांच्या जवळपास नुकसान झाले.

Livestock
Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठ्याचं घोडे अडलेलेच

या बाबत मंगळवारी (ता. २७) लोहगाव येथील शेतकरी व शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांची मुंबईत भेट घेतली. शासन संबंधित शेतकऱ्याला योग्य ती मदत करेल. दोन दिवसात लोहगावला भेट देईल, असे आश्‍वासन विखे यांनी दिले.

Livestock
Soybean Crop : दहा एकरांवरील सोयाबीनला लागल्या नाहीत शेंगा

लोहगाव येथील ढेरे यांच्या गोठ्यातील २९ पैकी २२ गाई विषबाधा झाल्याने दगावल्या. पशुवैद्यकांकडून सतत उपचार सुरु असतानाही गायींच्या मृत्यूचे सत्र सुरुच असल्याने ढेरे कुटुंबांसह परिसरातील दूध उत्पादक हतबल झाले आहेत. त्यांना मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी विखे यांच्याकडे केली.

Livestock
Crop Damage : दौंडमधील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

‘‘झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरकार सर्वोतपरी मदत करेल,’’ अशी ग्वाही विखे यांनी दिली. या वेळी त्यांनी नगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करुन संबधित घटनेची त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले.

दहातोंडे यांच्यासह लोहगाव येथील संजय ढेरे, पशू चिकित्सक सेवादाता असोसिएशनचे अध्यक्ष संतोष लांडे, जालिंदर ढेरे, गोरक्षनाथ गायकवाड, सुनील गाडगे, सारंगधर ढेरे, संभाजी शिंदे या वेळी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com