Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज

राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रसार प्रथम गडचिरोली जिल्ह्यात (सिरोंचा) मार्च-२०२० मध्ये दिसून आला होता. धुळे जिल्ह्यात सध्या धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यात या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

धुळे : जिल्ह्यात लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) या रोगाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष (Control Room For Lumpy Skin Disease) कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे लम्पी स्कीन आजाराची लक्षणे (Lumpy Skin Symptoms) आढळून आल्यास त्वरित तालुका किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy : ‘लम्पी स्कीन’ची पशुधनाला लागण

राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रसार प्रथम गडचिरोली जिल्ह्यात (सिरोंचा) मार्च-२०२० मध्ये दिसून आला होता. धुळे जिल्ह्यात सध्या धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यात या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. धुळे परिसरातही लम्पी सदृश जनावरे आढळून आली आहेत. त्यांच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यांचे रोग नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आजारी जनावरांवर उपचार व इतर जनावरांना हा आजार होऊ नये म्हणून लसीकरण करण्यात आले आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy : पंजाबमध्ये दूध उत्पादनात १५-२० टक्क्यांनी घट

कीटकनाशके फवारा

या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, चिलट्यांमार्फत होतो. हा आजार झालेल्या जनावरांमध्ये डोळे व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथींना सूज येणे, भरपूर ताप, दुग्धोत्पादन कमी होणे, चारा कमी खाणे, पाणी पिणे कमी होते. त्वचेवर गाठी येतात ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. या रोगाच्या प्रसारास प्रतिबंधासाठी रोग प्रादुर्भावादरम्यान विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी गोठ्यात, गावांत कीटकनाशक औषधांची फवारणी करावी. सध्या भारतात या रोगावर खात्रीशीर आणि प्रभावशाली रोग प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. मात्र, शेळ्यांमधील देवी रोगावर वापरण्यात येणारी ‘गोट पॉक्स'' या लशीद्वारे रोग आटोक्यात आणता येऊ शकतो. जनावरांच्या बाजारात फक्त लसीकरण व टॅग असलेल्या जनावरांनाच प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हास्तरीय अधिकारी संपर्क

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. पी. विसावे (८२७५५-६३५०४), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. एस. लंघे (९८२२२-९०२२८). जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक असे : सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन, धुळे) डॉ. ए. टी. वाडीले (९४२२४-०३७६९). पशुधन विकास अधिकारी डॉ. भूषण वाकडे (९०२९५-१३१८२), पशुधन विकास अधिकारी डॉ. एन. पी. ठाकूर (९४२०१- ४१८००).

तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष

पशुधन विकास अधिकारी (पंचायत समिती, धुळे) डॉ. प्रशांत निकम (९५१०६-६४३९१). पशुधन विकास अधिकारी (पंचायत समिती, शिंदखेडा) डॉ. बी. टी. देसले (७०८३७-१९३३७), पशुधन विकास अधिकारी (पंचायत समिती, शिरपूर) डॉ. एस. के. कुवर (९४०३२-४३२२५), पशुधन विकास अधिकारी (पंचायत समिती, साक्री) डॉ. योगेश गावित (९०११३-६११६५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com