डॉक्टरांकडून सेवाशुल्काची मागणी

काळाखडक येथे आजारी मेंढ्यांच्या उपचारार्थ आलेल्या डॉक्टरांनी मेंढपाळांकडे सेवाशुल्काची मागणी करताच मेंढपाळ चांगलेच संतापले.
Sheep
SheepAgrowon

पथ्रोट, जि. अमरावती : काळाखडक येथे आजारी मेंढ्यांच्या (Sheep Disease) उपचारार्थ आलेल्या डॉक्टरांनी मेंढपाळांकडे सेवाशुल्काची मागणी (Service Charges Demand By Doctor To Shepherd) करताच मेंढपाळ चांगलेच संतापले. मात्र भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे यांनी डॉक्टरांना त्यांच्या स्थितीबाबत समजावून सांगितल्याने प्रकरण शांत झाले. दरम्यान, तोंडखुरीची लागण झालेल्या मरणासुन्न मेंढ्यांना शक्ती मिळावी, याकरिता ग्लुकोज पावडर (Glucose) डब्याचे वाटप सुधीर रसे यांच्याकडून मेंढपाळांच्या वस्तीवर करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला.

Sheep
मेंढपाळांच्या वाड्यावर पोहोचले तीस डॉक्टर

आजारात मागील दोन दिवसांपासून एक हजारावर मेंढ्यांचा मृत्यू झाला असून हा आकडा दररोज वाढतच आहे. मरणासुन्न झालेल्या मेंढ्यांना शक्ती मिळावी, याकरिता ६० किलो ग्लुकोज डब्यांचे वाटप सुधीर रसे यांच्याकडून करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगावसुर्जी, अचलपूर तसेच अकोला मिळून जवळपास तीस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू आपल्या सहकाऱ्यांसह याठिकाणी काल दाखल झाली होती.

मेंढ्यांना झालेल्या आजाराच्या लक्षणानुसार उपचार करणे सुरूच ठेवले आहे. त्यानंतर पुन्हा डॉक्टरांची टीम औषधसाठा घेऊन त्याठिकाणी दाखल झाली आहे. हा आजार तीन टप्प्यांचा असल्यामुळे त्या आधारे उपचार करण्यासाठी तीन दिवसांचा कॅम्प त्याठिकाणी लावण्यात आला आहे. असे असले तरी मेंढ्यांच्या मृत्यूची संख्या वाढतच आहे. ही चिंतेची बाब ठरत आहे. याबाबत माहिती कळताच नायब तहसीलदार शंकर श्रीराव व गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांनी घटनास्थळी भेट दिली.

अचानक आलेली आपत्ती असल्यामुळे शासनाकडे सेवाशुल्काच्या मागणीबाबत माफीचा प्रस्ताव पाठवू, प्रसंगी लोकवर्गणी करू, अहवाल पॉझिटिव्ह आला तर लसीकरण मोफतच राहते. मग सेवाशुल्काचा प्रश्नच मिटतो.
मोहन गोहत्रे, सहायक उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अमरावती.
मेंढपाळांना मदत मिळावी, याकरिता मृत मेंढ्यांचा पंचनामा तथा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे.
मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com