पावसाळ्यातील जनावरांचे आजार आणि उपाय योजना

पावसाळ्यात जनावरांना विविध आजाराची बाधा होत असते. आजाराची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर योग्य ते उपचार केल्यास आपण जनावरांचे विविध आजारापासून संरक्षण करू शकतो.
animal disease
animal diseaseAgrowon

पावसाळ्यात जनावरांना विविध आजाराची बाधा होत असते. आजाराची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर योग्य ते उपचार केल्यास आपण जनावरांचे विविध आजारापासून संरक्षण करू शकतो. या विषयावर डॉ. विकास चत्तर यांच्याशी साधलेला हा सवांद

१. पावसाळ्यात जनावरांना एकंदरीत कोणते आजार होतात ?

पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या विविध आजारामध्ये पोटाचे, कासेचे आजार, सोबतच जिवाणूमुळे होणारे आजार त्यानंतर जास्त पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये ओढ्कामासाठी वापरले जाणारे बैल, रेडी यांना खुरांचे (Hooves disease) आणि परोपजीविमुळे होणारे आजार येतात.

animal disease
पावसाळ्यात असे टाळा खुरांचे आजार !

२. पोटांच्या आजारामध्ये या आजारांची बाधा झाल्यावर की केले पाहिजे ?

पोटाच्या आजारामध्ये पोटफुगी, पावसाळ्यामध्ये नवीन उगवलेलं विविध प्रकारचे गवत मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. कोवळे गवत अधिक खाल्ल्याने जनावरांना पोटफुगी झालेली दिसून येते. यात दोन प्रकार दिसून येतात, एक पोटात मोकळी हवा साचून राहते, दुसऱ्या प्रकारात ह्वेबेरोबर पाणीपण पोटात साचून राहते. नायट्रेट किंवा नायट्रायटची विषबाधा, ज्या भागात जास्त पाऊस पडतो त्या भागात अधिक नायट्रोजन गवतामध्ये शोषला जातो. असे कोवळे लुसलुशीत गवत अधिक खाऊ घातल्याने नायट्रेटची विषबाधा आढळून येते. लक्षणामध्ये जनावर लाळ गाळते, श्वास घ्यायला त्रास होतो. चक्कर येऊन जनावर खाली पडते. अधिक प्रमाणात विषबाधा असल्यास चक्कर येऊन जनावराचा मृत्यु होऊ शकतो. पशुपालकांनी त्वरित नजीकच्या पशुवैद्काशी संपर्क साधावा.

animal disease
पावसाळ्यात खुरांचे आजार बळकावतात ?

३. कासेचे आजाराबद्द्ल आपण आपल्या पशुपालकांना काय सांगाल ?

जनावरांचे दूध काढल्यानंतर सडाचे छिद्र पुढील अर्धा तास बंद होत नाही. ओलसर जागी जनावर बसल्यास जीवाणू सडातून आत शिरकाव करतात. परिणामी जनावराला मॅस्टास्टीस होतो. यात कासेच्या खालील भागात सूज आलेली दिसून येते. दूध पाण्यासारखे येऊन त्यात गाठी येतात. सडाभोवती माशा बसलेल्या दिसून येतात. चारा खाणे पूर्णपणे बंद करतो. दूध लालसर येते. कोणत्या प्रकारच्या जीवाणू मुळे मॅस्टास्टीस होतो हे कळाल्याने उपचार करण्यास सोपे जाते.

४. शेती कामांसाठी बैलांचा वापर प्रामुख्याने पावसाळ्यात केला जातो परिणामी बैलामध्ये खुरांचे आजार बळकावतात?

पावसाळ्यात सतत चिखल राहिल्याने तसेच गोठयातील जागा ओलसर राहिल्याने सतत पाय चिखलात, ओलसर राहिल्याने खुरामध्ये जखमा होतात. या जखमांवर जीवाणूचा संसर्ग होऊन खुर सडण्याचे आजार होतात. परिणामी जनावर लंगडायला लागते. पशुवैद्कामार्फत योग्य ती प्रतिजैविके आणि वेदनाशामक औषधे द्यावीत. अशा जनावरांना काही काळ आराम दिला पाहिजे, तसेच त्यांना कोरड्या जागेवर बाधावे.

५. पावसाळ्यात अनेक जिवाणूजन्य, विषाणूजन्य आजार जनावरांना होत असतात, त्याबद्दल आपण की सांगाल?

जिवाणूमुळे होणाऱ्या आजारामध्ये घटसर्प, फऱ्या. घटसर्प आजारामध्ये जनावरांच्या गळ्याला सूज येते, अधिक ताप येतो. जनावरांचा अचानक मृत्यु होतो. फऱ्या आजारामध्ये जनावरांच्या पायाच्या मांसल भागाला सूज येते. त्या ठिकाणी दाबल्यास चरचर असा आवाज येतो. पशुवैद्काच्या सल्ल्याने योग्य तो उपचार केल्यास जनावर बरा होऊ शकतो.

६. परोपजीवीजन्य आजार जनावरांना होत असतात, त्याबद्दल आपण की सांगाल?

पावसाळ्यात जेव्हा उष्ण व दमट वातावरण असते. त्या वेळेस जनावरांच्या अंगावर गोचीड होण्याचे प्रमाण जास्त होते. अधिक प्रमाणात आढळणारा ताप म्हणजे गोचीड ताप (थायलेरीया) यात लासिकाग्रंथिना सूज येते. यात चारा खाण्याचे प्रमाण होणे, दूध देण्याचे प्रमाण कमी होणे, अधूनमधून ठसकणे अशी लक्षणे सुरुवातीला दिसून येतात. अशी लक्षणे दिसल्यास जनावरांना सुप्त अवस्थेतील थायलेरीयासिस झालाय असं समजावे. दृश्य स्वरूपातील गोचीड ताप यामध्ये जनावरांना १०४ ते १०५ अंश सेल्सियस इतके तापमान असते. जनावरांच्या नाकातून पाणी येते. अधिक तीव्रता असल्यास जनावरांचे रक्त पातळ होते, परिणामी त्यांना कावीळ होते. अशा जनावरांमध्ये रक्त संक्रमण करून आपण त्या जनावरांचे प्राण वाचवू शकतो.

७. आजार होऊ नये म्हणून पशुपालकांनी काय केले पाहिजे आणि झाल्यानंतर पशुपालकानी काय केले पाहिजे?

पोटाचे आजार होऊ नये म्हणून पावसाळ्यात उगवलेला हिरवा चारा अधिक प्रमाणात खाऊ घालू नये. टी. एम. आर. यात हिरवा चारा, वाळलेला चारा आणि खुराक योग्य प्रमाणात दिल्यास जनावरांना पोटाचे आजार होणार नाहीत. कासेच्या आजारांचे प्रतिबंध करण्यासाठी दूध काढल्यानंतर जनावराला चारा आणि खुराक दिले पाहिजे. दूध काढल्यानंतर सड टीट डीप मध्ये बुडवून घ्यावित. गोठ्यात दुधाळ जनावरे बांधण्याच्या जागेवर चुन्याची भुकटी पसरवून घ्यावी. जिवाणूजन्य आजार होऊ नये म्हणून लसीकरण केले पाहिजे. गोचीड नियंत्रणासाठी गोठ्यात स्वच्छता ठेवावी. खुरांच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांना कोरड्या जागी बांधावे.

डॉ. विकास चत्तर ,

पशुधन विकास अधिकारी गट - अ ,

ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर

मो.नं. -9765215573

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com