जिवापाड जपलेल्या रेड्यानेच घेतला शेतकऱ्याचा जीव

ज्या रेड्यावर शेतकऱ्याने जिवापाड प्रेम केले, त्या रेड्यानेच त्या शेतकऱ्याचा जीव घेतल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली.
जिवापाड जपलेल्या रेड्यानेच घेतला शेतकऱ्याचा जीव

सोलापूर ः ज्या रेड्यावर (Buffalo Bull) शेतकऱ्याने जिवापाड प्रेम केले, त्या रेड्यानेच त्या शेतकऱ्याचा जीव (Farmer Died) घेतल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. धर्मराज पांडुरंग साठे (वय ५५) असे त्या रेड्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Buffalo Bull Attack On Farmer)

जिवापाड जपलेल्या रेड्यानेच घेतला शेतकऱ्याचा जीव
Animal Care : जनावरांतील जंतनिर्मूलन कसे कराल?

या बाबत मिळालेली माहितीनुसार, बीबीदारफळ येथील शेतकरी धर्मराज साठे यांनी या रेड्याला मोठ्या कष्टाने जपले होते. म्हैस रेतनासाठी म्हणून त्यांनी हा रेडा पाळला होता. त्यामुळे त्याच्या खुराकासह सर्व ती काळजी ते घ्यायचे. अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांनी त्याचा सांभाळ केला होता. परवा नेहमीप्रमाणे सावळेश्‍वर रस्त्यावर उसाच्या बाजूला बांधावर ते रेड्याला चारत होते. पण अचानकपणे हा रेडा सैरभैर झाला आणि थेट त्याने साठे यांच्यावरच हल्ला सुरू केला. सुमारे तासभर हा रेडा साठे यांना तुडवत होता. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाने त्या वेळी त्यांची सुटका करण्यासाठी जवळपास लोकही नव्हते. पण ज्यावेळी लोक आले, तोवर वेळ निघून गेली होती.

लाखाला मागितला, पण प्रेमापोटी विकला नाही

गेल्या महिन्यातच त्याने साठे यांच्यावर हल्ला केला होता. त्याच वेळी काही गावकऱ्यांनी या रेड्याला विकण्याचा सल्ला दिला. अगदी पंधरवड्यापूर्वी एका ग्राहकाने हा रेडा तब्बल एक लाख रुपयांना साठे यांना मागितलाही होता. मात्र साठे यांनी प्रेमापोटी त्याला विकले नाही. पण शेवटी या रेड्यावरील अतिप्रेमच शेतकऱ्यासाठी जीवघेणे ठरले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com