Lumpy Skin : जनावरांना पौष्टिक आहार द्या

लम्पी स्कीन या संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांची नियमित शुश्रूषा करणे आवश्यक
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

अकोलाः लम्पी स्कीन (Lumpy skin) या संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांची नियमित शुश्रूषा करणे आवश्यक असून त्यासोबतच त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त पौष्टिक आहार (Healthy Diet Animal) द्यावा, असा सल्ला पशुवैद्यकांनी दिला आहे. पशुवैद्यकांच्या सल्ल्याचे पालन पशुपालकांनी करावे. आपल्या गुरांना मोकाट सोडू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. गुरांना मोकाट सोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Lumpy Skin
Farmer Producer Company : जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवलेली ‘ओम गायत्री’ कंपनी

दरम्यान, लम्पी स्कीन आजारामुळे जिल्ह्यात १,६२२ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यापैकी ९१३ जनावरांच्या पालकांना २ कोटी २६ लाख ३८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित मदतीचे वितरण प्रक्रिया प्रगतिपथावर आहे, अशी माहिती प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत देण्यात आली.

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अरोरा अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, डॉ. तुषार बावने बैठकीला उपस्थित होते.

Lumpy Skin
Crop Damage : नुकसानीबाबत साडेचार लाख दावे

२ कोटी २६ लाख ३८ हजार वितरित

गोवंशीय जनावरांमधील लम्पी स्कीनच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्थितीचा आढावा या वेळी घेण्यात आला. जिल्ह्यात २ लाख ३३ हजार २७२ गोवंशीय जनावरे आहेत. आतापर्यंत २८ हजार १९८ जनावरांना लम्पी स्कीनचा संसर्ग झाला असून, २४ हजार २१८ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. आतापर्यंत १,६२२ जनावरे दगावली असून २,३५८ जनावरे सध्या सक्रिय रुग्ण आहेत. ाष्ट्रीय आपत्ती धोरणातील निकषांनुसार मृत्यू पडलेल्या जनावरांच्या पशुपालकांना मदत देण्यात येत आहे.

कायदेशीर कारवाईचा इशारा

शहरात मोकाट फिरणारे गुरे हे महापालिकेच्या कोंडवाड्यात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्याठिकाणी जनावरांना लागणारा चारा देण्याची व्यवस्था आहे. शिवाय दररोज पशुवैद्यकांनी कोंडवाड्यातील जनावरांची तपासणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले. जे पशुपालक आपल्या जनावरांना मोकाट सोडून देतात त्यांची जनावरे कोंडवाड्यात ठेवली जातील. तसेच पशुपालकांविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९६० चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com