Poultry disease - कोंबड्यातील जंत निर्मूलन कसे कराल ?

जंत कोंबड्याच्या आतड्यामध्ये, इतर अवयवांमध्ये आढळतात.
Poultry Deworming
Poultry DewormingAgrowon

कोंबड्यांमध्ये बऱ्याच वेळेस जंत प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये विशेषतः परसबागेतील मुक्तपणे बाहेर फिरून अन्न मिळवणाऱ्या कोंबड्यांमध्ये शेडमधील कोंबड्यांपेक्षा जास्त प्रमाणात जंत प्रादुर्भाव (Poultry Deworming) आढळतो. जंत कोंबड्याच्या आतड्यामध्ये, इतर अवयवांमध्ये आढळतात. कोंबड्यामध्ये गोलकृमी, चपटे कृमी व टेपवर्म चा प्रादुर्भाव आढळतो. पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर य़ेथील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यानी जंतनिर्मूलनाविषय़ी पुढील माहिती दिली आहे.

Poultry Deworming
पावसाळ्यात जंत प्रादुर्भाव वाढतो?

जंत प्रादुर्भावाची लक्षणे काय आहेत?

जंत पचवलेले अन्न खाऊन किंवा रक्तावर जगतात. जंत प्रादुर्भावामुळे कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते, परंतु वाढ खुंटते, निस्तेज दिसतात.

कोंबडीच्या पोटाचा खालचा भाग मोठा दिसतो. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते, रक्तक्षय होतो.

जंतप्रादुर्भाव प्रमाणापेक्षा जास्त असेल तर विष्ठेमध्येही जंत दिसू लागतात.

कोंबड्या अशक्त होतात, हगवण लागते, वजन कमी होते, अंडी उत्पादन कमी होते.

तलंगा व वाढणाऱ्या कोंबड्यामध्ये मानमोडी (राणीखेत रोग) आजाराचे लसीकरण करण्यापूर्वी म्हणजेच वयाच्या ७ ते ८ आठवड्याला व १६ ते १७ व्या आठवड्याला जंतनिर्मूलन करून घ्यावे.

सर्वसाधारणपणे गादीवरील मोठ्या कोंबड्यांमध्ये महिन्यातून एकदा तर पिंजऱ्यातील कोंबड्यांमध्ये ३ महिन्यातून एकदा जंतनिर्मूलन करावे.

जंतनिर्मूलनासाठी तज्ज्ञांच्या सल्यानुसारच पायप्रॅझीन, अलबेंन्डॅझोल, लेव्हमिसॉल, टेटरामिसॉल इत्यादी औषधी वापरली जातात.

जंतनिर्मूलनादिवशी व नंतर दोन दिवस जीवनसत्त्व व इलेक्‍ट्रोलाईट पाण्यातून कोंबड्यांना द्यावी. जेणेकरून जंतनिर्मूलनाचा ताण होणार नाही.

Poultry Deworming
शेळ्यांच्या पोटात जंत येतात कुठून?

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

शेडमध्ये स्वच्छता ठेवावी, पाणी सांडून होणारा ओलावा, कोंदटपणा अजिबात नसावा.

कोंबड्यांना भरपूर जागा, हवा व प्रकाश मिळावा.

सर्व वयोगटाच्या कोंबड्या एकमेकांत मिसळू नयेत. त्याऐवजी पिले व मोठ्या कोंबड्या वेगवेगळ्या ठेवाव्यात.

माशा, गोगलगाई, गांडूळ, कीटक इत्यादींचा नायनाट करावा.

कोंबड्यांचे खाद्य व पाणी, विष्ठेने बाधीत होणार नाही याची काळजी घ्यावी.

रोगी कोंबड्यांवर तात्काळ उपचार करावा.

कोंबड्यांना जीवनसत्वयुक्त टॉनीक आहारातून द्यावे.

पहिले जंतनाशन - ४ आठवडे वयाच्या कोंबड्यांना द्यावे. दुसरे जंतनाशन - ८ आठवडे वयात तर तिसरे जंतनाशन - १२ आठवडे वयाच्या कोंबड्यांना द्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com