Animal Care : लक्षणांवरून ओळखा जनावरांतील रेबीज

पाळीव प्राण्यांमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे (Dog Bite) रेबीज (Rabies In Animal) होतो. रेबीज झालेल्या प्राण्यांची योग्य काळजी घेतली नाही, तर त्यांच्या दूषित लाळेतून, रेबीजचा प्रसार होतो. टिश्युकल्चर लसीकरण (Vaccination) हे सर्वांत सुरक्षित आहे.
Animal Health
Animal Health Agrowon

डॉ. बी. सी. घुमरे, डॉ. प्रांजल कदम

रेबीज आजार विषाणूपासून होतो. रेबीजचे विषाणू मुख्यतः पिसाळलेल्या किंवा रेबीजची लागण झालेल्या कुत्र्यांच्या लाळेत आढळतात.

- लागण झालेल्या कुत्र्याच्या चावण्यामुळे दूषित लाळेवाटे विषाणू मनुष्य किंवा इतर जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात.

- वटवाघळांच्या शरीरातही हे विषाणू आढळतात. मुख्यतः जनावरांमध्ये वटवाघूळ चावल्यामुळे रेबीज होऊ शकतो.

- पाळीव प्राण्यांमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबीज होतो. लागण झालेल्या प्राण्यांची योग्य काळजी घेतली नाही, तर त्यांच्या दूषित लाळेतून, रेबीजचा प्रसार होतो.

- लागण झालेले जनावर उत्तेजित अवस्थेत असेल तर ते दुसऱ्याला चावण्याचा प्रयत्न करते.

- लाळेतून जखम झालेल्या भागात हे विषाणू प्रवेश करतात. सर्व शरीरात पसरतात, याचा प्रसार रक्तातून होत नाही तर मज्जातंतूद्वारे होतो.

-

Animal Health
Animal Care : वासरांसाठी पौष्टिक काफ स्टार्टर कसं बनवाल?

हे विषाणू मुख्यतः शरीराच्या निरनिराळ्या ग्रंथीमध्ये प्रवेश करतात, जसे की लाळ ग्रंथी ज्यामुळे आजारी जनावराची लाळ दूषित होते.

- निरोगी जनावरांच्या जखमेचा संपर्क या लाळेबरोबर येतो तेव्हा हे विषाणू त्या जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. म्हणून मुख्यतः पिसाळलेला कुत्रा, माकड, प्राणी चावल्यानंतर रेबीज होतो.

लक्षणे ः

- रेबीज लक्षणे दिसण्याची वेळ जखम शरीराच्या कोणत्या भागावर आहे यावर अवलंबून असतात. जर जखम डोके, खांद्यावर असेल, तर लक्षणे लवकर दिसतात. जखम पायावर असेल तर लक्षणे उशिरा दिसतात.

- ज्या ठिकाणी मज्जातंतूचे जाळे जास्त पसरले आहे तेथून विषाणू लवकरात लवकर मेंदूमध्ये पोहोचतात.

- लक्षणे दिसण्याचा काळ मनुष्यामध्ये २१ दिवसांपासून १२ वर्षांपर्यंत असू शकतो. काही वेळा हे विषाणू शरीरात सुप्त अवस्थेतही राहतात.

- लक्षण अवस्थेचे वर्गीकरण हे मंद अवस्था, उत्तेजनात्मक अवस्था पक्षाघाताची अवस्था यामध्ये केलेले आहे.

Animal Health
Animal Care : कसे ओळखायचे जनावरांतील पोटाचे आजार ?

निदान ः

- लक्षणावरून तसेच प्राथमिक माहितीद्वारे (कुत्रा चावला असल्यास) तसेच प्रयोगशाळेत तपासणी.

उपचार आणि लसीकरण ः

- आजार झाल्यावर जनावरे व मनुष्याकरिता प्रतिजैविके किंवा इतर औषधे उपलब्ध नाहीत. म्हणूनच रेबीज होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.

- रेबीजवर दोन प्रकारच्या लसीकरणाचा वापर केला जातो. एक कुत्रा चावण्याच्या आधी व एक चावल्यानंतर.

Animal Health
Animal Care : निकृष्ट चारा, पशुखाद्याचे वाढवा पोषणमूल्य

- रिस्क ग्रुप म्हणजेच ज्या व्यक्तींना रेबीजचा जास्त धोका आहे (उदा. पशुचिकित्सक, कुत्रा पाळणारे मालक) या व्यक्तींना कुत्रा चावण्याआधीच लसीकरण करावे. दुसऱ्या प्रकारची लस ही कुत्रा चावल्यानंतर दिली जाते.

जखमेची काळजी ः

- कुत्रा किंवा इतर जनावर चावल्यानंतर जखम वाहत्या पाण्याखाली साबणाने स्वच्छ धुवावी. जेणेकरून ते विषाणूंना मारण्यास उपयुक्त ठरेल.

- साबणाने जखम स्वच्छ धुतल्यानंतर त्यावर जंतुनाशक लावावे. नंतर पोस्ट बाईट लसीकरण करावे. जखम बांधू नये, उघडी ठेवावी.

- जखमेवर दाह होईल असे घटक म्हणजेच मीठ, मिरची पूड चोळू नये. कारण दाह झाल्यावर मज्जातंतू जास्त उघडे पडतील. विषाणू पटकन शरीरात प्रवेश करतील.

रेबीज टाळण्यासाठी उपाययोजना ः

- जखम स्वच्छ धुवावी. योग्य काळजी घ्यावी.

- लसीकरणाचा तक्ता पूर्णपणे पाळावा.

- जखमा जास्त खोल व चेहऱ्याजवळ असतील तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

- चावलेल्या कुत्र्यावर दहा दिवसांपर्यंत लक्ष ठेवावे.

- टिश्युकल्चर लसीकरण हे सध्या उपलब्ध असलेले सर्वात सुरक्षित लसीकरण आहे, म्हणून सरकारी व खासगी दवाखान्यात या लसीकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

- पाळीव कुत्र्यांचे नोंदणीकरण आणि लसीकरण करून घ्यावे.

संपर्क

डॉ. बी. सी. घुमरे, ९४२१९८४६८१

डॉ. प्रांजल कदम, ८१०४९४५८२०

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com