Animal Care : पशुआहारात कॅल्शिअम महत्त्वाचे...

जनावरांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण जवळ जवळ एक टक्के एवढे असते. शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम हाड व दातांमध्ये असते. कॅल्शिअम मऊ पेशीत व रक्तात साठवलेले असते.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ.आर.बी.अंबादे , डॉ.पी.पी.घोरपडे

जनावरांच्या शरीरातील अनेक शारीरिक आणि जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये कॅल्शिअमचा (Calcium) मोठ्या प्रमाणावर सहभाग करतो. यामध्ये रक्त जमा करणे, स्नायूंच्या उत्तेजना आणि आकुंचन यांचे जोडणे, मज्जातंतूंच्या उत्तेजिततेचे नियमन, शुक्राणूंची (Sperm) गतिशीलता, ओव्याचे फलन, पेशींचे पुनरुत्पादन यांचा समावेश होतो. कॅल्शिअम हे संदेशवाहकामध्ये महत्त्वाचे काम करते. सर्व स्नायू पेशींच्या आकुंचनमध्ये कॅल्शिअमची भूमिका महत्त्वाची असते. (Importance Of Calcium In Animal Feed)

जनावरांच्या शरीरामध्ये आम्ल - अल्कली संतुलन करणे, पाण्याचे संतुलन करणे, मांस पेशी व मज्जासंस्थेवर नियंत्रण करणे, गर्भाच्या वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअम महत्त्वाचे ठरते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये प्रजोत्पादनासंबंधी समस्या दिसते.

जनावरांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण जवळ जवळ एक टक्के एवढे असते. शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम हाड व दातांमध्ये असते. कॅल्शिअम मऊ पेशीत व रक्तात साठवलेले असते. जनावरांच्या उत्पादन आणि आरोग्याच्या व्यवस्थापनात कॅल्शिअम हे महत्त्वाचे घटक आहे. पशू व्यवस्थापनात हिरवा पालेदार चारा मुख्यत्वे द्विदल चारा हा कॅल्शियमचा उत्तम स्तोत्र आहेत.

Animal Care
Animal Care : काय आहेत लंपी त्वचा रोगाची लक्षणे ?

कॅल्शिअमचे कार्य:

१) हाड व दातांची उत्तम वाढ होण्यासाठी, रक्त गोठवण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते.

२) जनावरांच्या शरीरामध्ये पाण्याचे संतुलन करणे, ऑस्मॉटिक प्रेशर संतुलन करण्यासाठी उपयुक्त ठरते.

३) मांस पेशी व मज्जा संस्थेवर नियंत्रण करते. शरीरामध्ये विविध प्रकारचे विकर तयार होण्यासाठी मदत करते.

कॅल्शियमच्या कमतरतेचा परिणाम :

१) जनावरांची वाढ खुंटते, दूध उत्पादन कमी होते, शरीरातील रक्त गोठण्यास वेळ लागतो. हाडे ठिसूळ होतात.स्नायूत अशक्तपणा येतो.

२) लहान जनावरात मुडदूस आणि प्रौढ जनावरांत उरमोडीची लक्षणे दिसतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होते.

३) गाई आणि म्हशीमध्ये प्रजोत्पादनासंबंधी समस्या दिसतात.

Animal Care
Animal Care: जनावरांमध्ये स्पायडर लिलीची विषबाधा

उपचार:

१) जनावराला नियमित खाद्यातून कॅल्शियमयुक्त क्षार मिश्रणे द्यावीत.मोठ्या जनावरांत ५० ते १०० ग्रॅम तर लहान जनावरांत १५ ग्रॅम द्यावे.

२) जनावराला द्विदल पिकाचा पालेदार चारा द्यावा.

३) दुग्धज्वर आजारावर पशुतज्ज्ञाच्या सल्याने उपचार करावेत.

Animal Care
Animal care : लम्फी स्कीन रोगावर नव्या लसीची मात्रा

कॅल्शिअमची कमतरता होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय:

१) रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये विशेषतः दुधाळ गाई, म्हशींमध्ये २५ ग्रॅम ते ५० ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे. पशू आहारात लुसर्न किंवा डाळ वर्गीय चाऱ्याचा समावेश असावा.

२) गाई, म्हशीच्या गाभण काळाच्या शेवटच्या १ ते २ आठवड्यात कमी कॅल्शियमयुक्त आहार द्यावा.

३) जनावराची नियमित व्यायाम होईल याची काळजी घ्यावी.

४) पशू तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार जीवनसत्वे "ड " चे इंजेक्शन गाय,म्हैस विण्याअगोदर एक आठवडा आधी द्यावे.

अतिप्रमाणात कॅल्शिअमचे दुष्परिणाम:

१) कॅल्शिअमचे इंजेक्शन देते वेळी जनावर एकदम घाबरते.

२) कॅल्शियमच्या दुष्परिणामांमुळे हृदयाचा ठोक्यांची संख्या वाढते, श्वसनास त्रास होतो, जनावर थरथरते. काही वेळा तत्काळ मृत्युमुखी पडणे अशी लक्षणे आढळतात.

कॅल्शिअम चे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय:

१) कॅल्शियमयुक्त द्रावणामध्ये कचरा, बुरशीजन्य वाढ नसावी.

२) कॅल्शियमच्या द्रावणाची बाटली जनावराच्या शरीर तापमानाबरोबर गरम असावी.

३) कॅल्शिअमचे इंजेक्शन पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार योग्य प्रमाणात द्यावे.

४) कॅल्शिअमची अति मात्रा देणे टाळावे.

५) जिवाणू / विषाणूंमुळे रक्तदोष झालेल्या जनावराला कॅल्शिअमचे द्रावण शिरेतून न देता कातडीखाली द्यावे.

६) कॅल्शिअमचे इंजेक्शन शिरेतून देतेवेळी जनावर शांत उभे राहील याची काळजी घ्यावी.

७) विनाकारण वारंवार कॅल्शिअमचे इंजेक्शन देणे टाळावे.

संपर्क ः डॉ. आर. बी. अंबादे ,८३५५९४२५४ ६ / ९१६७६८२१३४

(लेखक पशू जीवरसायन शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परेल, मुंबई येथे कार्यरत आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com