Animal Care : निरोगी आरोग्यासाठी रोग प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व

पशुपालन व्यवसायातील सर्व आर्थिक गणित हे जनावरांच्या आरोग्यावर अवलंबून असते. निरोगी पशुधन ही यशस्वी पशुपालन व्यवसायाची गुरुकिल्ली मानली जाते.
Animal Care
Animal Care Agrowon

डॉ. पी. पी. घोरपडे, डॉ. आर. बी. अंबादे

पशुपालन व्यवसायातील सर्व आर्थिक गणित हे जनावरांच्या आरोग्यावर (Animal care) अवलंबून असते. निरोगी पशुधन ही यशस्वी पशुपालन व्यवसायाची गुरुकिल्ली मानली जाते. वातावरण बदलामुळे जनावरे विविध प्रकारच्या आजारांना बळी पडतात. आजारांचे प्रामुख्याने संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य असे दोन प्रकार पडतात.

Animal Care
Milk Dairy : जिल्हा दूध संघाच्या दूध संकलनात वाढ

त्यापैकी संसर्गजन्य आजाराबाबत अधिक जागृत राहणे आवश्यक आहे. जनावरांना कोणत्याही आजाराची बाधा होण्यास अनेक प्रकारचे जिवाणू आणि विषाणू कारणीभूत असतात. रोगकारक जिवाणू किंवा विषाणूंनी जनावरांच्या शरिरात प्रवेश केल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली जनावरे रोगांना बळी पडतात.

त्यासाठी जनावरांची आणि गोठ्याची निगा, आजारी जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. यासोबतच नियमितपणे जनावरांना विविध आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे. रोगप्रतिबंधात्मक लसीकरण केल्यामुळे जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. त्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

Animal Care
Sugar Export : मे नंतर आणखी साखर निर्यातीस परवानगी शक्य

संसर्गजन्य आजार

हा आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला किंवा एका कळपातून दुसऱ्या कळपात झपाट्याने पसरतो. आजाराचा प्रसार प्रामुख्याने दूषित अन्न, पाणी व हवा या माध्यमातून होतो. या साथीच्या आजारांमुळे जनावरे आजारी पडून दगावण्याची शक्यता असते. योग्य उपचाराअंती आजारातून वाचलेल्या जनावरांमध्ये उत्पादनक्षमता कमी होते.

त्यामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यावर मात करण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक लसीकरण हाच एकमेव उत्तम पर्याय आहे. रोगप्रतिबंधात्मक लसीकरण म्हणजे जनावराच्या शरीरात विशिष्ट रोगाचे जिवाणू किंवा विषाणूपासून उद्भवणाऱ्या रोगाची प्रतिबंधात्मक लस टोचून त्या रोगाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करणे.

Animal Care
Jalgaon Milk Association : दूध संघ निवडणुकीत नियमांची पायमल्ली

प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे जनावरांच्या शरिरात एका ठराविक कालावधीपर्यंत रोगाविरूद्ध प्रतिकारशक्ती टिकून राहते. त्यामुळे जनावर साथीच्या आजारास बळी पडण्याची शक्यता कमी होते. जनावर आजारी पडल्यानंतर लसीकरण केल्यास त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे आजाराला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हाच एकमेव उपाय आहे.

लसीकरणावेळी घ्यावयाची काळजी

जनावराला ताप येणे, जुलाब होणे, खराब शारीरिक स्थिती किंवा तणावग्रस्त स्थितीत असलेल्या जनावरांना लसीकरण करणे टाळावे. आजारी किंवा तणावग्रस्त जनावरांवर लसीकरण अपेक्षित परिणाम होत नाही.

प्रतिबंधक लसीकरण नेहमी निरोगी जनावरांना करावे. रोगाची लागण झालेल्या जनावरांमध्ये किंवा साथ सुरु असताना लसीकरण करू नये.

गाभण जनावरांना लसीकरण करताना विशेष काळजी घ्यावी. लसीकरण हे अनुभवी पशुवैद्यकांकडून करावे.

Animal Care
Agri Commodity MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर | ॲग्रोवन

लस खरेदी करताना तिची कालबाह्य दिनांक तपासून घ्यावी. लसीकरण करताना लस उत्पादकाच्या सूचनेचे पालन करावे. जसे की, लसीकरणाची मात्रा, लस देण्याची पद्धत इ. बाबी बारकाईने वाचाव्यात आणि त्यानंतरच लसीकरण करावे.

लसीकरण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे.

एक लस वापरून झाल्यानंतर तीच लस पुन्हा दुसऱ्या जनावरांसाठी वापरू नये. लसीकरणासाठी वापरलेले साहित्य वापरापूर्वी व नंतर निर्जंतुक करावे.

लस टोचल्यानंतर लस दिलेली जागा हाताने थोडा वेळा व्यवस्थित चोळावी.

लसीकरण केलेली दिनांक नोंद करून ठेवावी. जेणेकरून दुसऱ्या वेळी लसीकरण करणे सोपे होईल.

संसर्गजन्य आजारास कारणीभूत घटक

आजार कारणीभूत जिवाणू

किंवा विषाणू

एफ.एम. डी. पिकोर्ना विषाणू

घटसर्प पासचुरेल्ला माल्टोसीडा

Animal Care
Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

काळपुडी बॅसिलस अँथ्रॅसिस

फऱ्या क्लोस्ट्रिडियम शोवाई

देवी/शीप पॉक्स/लम्पी स्किन त्वचा रोग कॅप्री पॉक्स विषाणू

आंत्रविषार क्लोस्ट्रिडीयम परफ्रिनगेन्स

लसीकरण वेळापत्रक

रोगाचे नाव लसीचे नाव लसीची मात्रा (त्वचेखाली) लसीकरणाची वेळ

गाई आणि म्हैस

१) लाळ्या खुरकूत रक्षा, एफ.एम. डी. लस ३ मिलि वर्षातून २ वेळा (मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात)

२) घटसर्प आलम पी.पी. टी लस ५ मिलि वर्षातून १ वेळ (एप्रिल)

३) फऱ्या बी. क्यू. लस ५ मिलि वर्षातून १ वेळ (मे)

४) काळपुडी अन्थ्रॅक्स स्पोअर लस १ मिलि वर्षातून १ वेळ (मे)

शेळी आणि मेंढी

१) लाळ्या खुरकूत रक्षा, एफएमडी लस १ मिलि वर्षातून १ वेळ (डिसेंबर)

२) देवी शीप पॉक्स लस १ मिलि वर्षातून १ वेळ (डिसेंबर)

३) काळपुडी अन्थ्रॅक्स स्पोअर लस १ मिलि वर्षातून १ वेळ (मे)

४) घटसर्प आलम पी.पी. टी लस २.५ मिलि वर्षातून १ वेळ (जून)

५) फऱ्या बी. क्यू. लस २.५ मिलि वर्षातून १ वेळ (जून)

६) आंत्रविषार इ.टी.व्ही. लस २.५ मिलि वर्षातून १ वेळ (मे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com