देशातील दुसरा डॉंकी फार्म कर्नाटकात

देशातील पहिला डॉंकी फार्म सुरु करणाऱ्या ॲबी बेबी यांनीही गाढवाच्या दुधाला असणारे महत्व लक्षात घेऊन हा व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्यानंतर आता कर्नाटकात असा डॉंकी फार्म सुरु करण्यात आला आहे.
देशातील दुसरा डॉंकी फार्म कर्नाटकात
Donkey FarmingAgrowon

शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून लोक आपल्याकडे पशुपालन व दुग्ध व्यवसायाकडे वळतात. गायी, म्हशी, शेळ्या मेंढ्या पाळतात. मांस आणि दूध अशा दुहेरी दृष्टीने शेळी वा मेंढीपालन केले जाते. व्यवसाय म्हणून कोणी गाढव पाळल्याचे आपल्या फार ऐकिवात नसते. मात्र आता या व्यवसायाकडेही गांभीर्याने बघितले जाईल, अशी शक्यता आहे.

कर्नाटकातील एका सुशिक्षित व्यक्तीने डॉंकी फार्मिंग (Donkey Farming) अर्थात गाढवं पाळली आहेत. मंगळूरूपासून जवळच श्रीनिवास गौडा यांचे डॉंकी फार्म व ब्रीडिंग सेंटर आहे.

गौडा हे बंगळुरुजवळील रामनगर या गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी आता गाढवंही पाळायला सुरुवात केली. गौडा यांचे डॉंकी फार्म हे कर्नाटकातील पहिले आणि देशातील दुसरे डॉंकी फार्म ठरले आहे. यापूर्वी केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील राममंगलम येथे देशातील पहिला डॉंकी (Donkey Farm) फार्म उभारण्यात आलाय.

देशातील पहिला डॉंकी फार्म सुरु करणाऱ्या ॲबी बेबी यांनीही गाढवाच्या दुधाला असणारे महत्व लक्षात घेऊन हा व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्यानंतर आता कर्नाटकात असा डॉंकी फार्म (Donkey Farm) सुरु करण्यात आला आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.

श्रीनिवास गौडा यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. बंटवाल तालुक्यात गौडा यांनी २.३ एकर परिसरात शेती करायला सुरुवात केली.तिथे त्यांनी 'आयसरी फार्म'ची स्थापना केली. शेतीसोबतच पशुपालन, पशुवैद्यकीय सेवा, चारा विकास व प्रशिक्षण केंद्र सुरु केले. २०२० साली गौडा यांनी शेळीपालन सुरु केले. गौडा यांच्याकडे ससे, कडकनाथ कोंबड्या आहेत. याच शेतीत गौडा यांनी गाढवं पाळायला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे शेतात २० गाढव आहेत.

२०१२ च्या पशुगणनेनुसार देशात ३ लाख ६० हजार गाढव होते. २०१९ मध्ये गाढवांची संख्या १ लाख २७ हजारांवर आली आहे. पूर्वी धोब्यांकडे गाढवे असायची. नंतरच्या काळात लॉंड्री मशीनचा वापर वाढला, इतर तंत्रज्ञान उपलब्ध झाले अन धोब्यांकडच्या गाढवांची संख्या घटली. नदीवरून वाळू वाहून आणण्याच्या अथवा अवजड मालाची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा वापर केला जात.

सुरुवातीला गाढव पाळण्याच्या कल्पनेवर लोकांनी टीका केली. मात्र इतर पाळीव प्राण्यांप्रमाणेच गाढव पाळण्याच्या निर्धार प्रत्यक्षात आणल्याचे गौडा सांगतात. आम्ही आता गाढवांचे दूध विकतो. गाढवाचे दूध औषधी समजल्या जाते. गाढवाच्या दुधापासून औषधे, सौंदर्य प्रसाधने बनवली जातात.

सौंदर्य प्रसाधन बनवणाऱ्या कंपन्यांकडून सध्या आपल्याकडे १७ लाख रुपयांच्या ऑर्डर्स आल्या आहेत. सध्या ३० मिलिलिटर दुधाला १५० रुपये दर मिळतो. पुढच्या महिन्यापासून आम्ही गाढवाचे दूध शहरातील सुपरमार्केट्स, मॉल्स आणि दुकानातही उपलब्ध करून देणार असल्याचे गौडा म्हणालेत. फेअरनेस क्रीम,शांपो, सोप्स, लीप बाम, बॉडी वॉश आणि अन्य शेकडो सौंदर्य प्रसाधनांसाठी गाढवाचे दूध वापरण्यात येते. त्यामुळे डॉंकी फार्मिंग हा लाभदायक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी गायी,म्हशी, शेळीपालनासारखेच या व्यवसायाचाही विचार करावा, असेही गौडा म्हणालेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com