जनावरांच्या वंध्यत्वास कारणीभूत घटक

वंध्यत्वाचे प्रमाण संकरीत गायीमध्ये जास्त आहे, काही ठिकाणी हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यापर्यंत वाढलेल दिसून येते. प्रत्येक पशुपालकाला आपल्या गोठ्यात जास्त दूध देणारी, अधिक काळ दूध देणारी गाय हवी असते. परंतु हे हव असताना तिच्या प्रजनन व्यवस्थापनाकडे मात्र आपण दुर्लक्ष करत असतो.
जनावरांच्या वंध्यत्वास कारणीभूत घटक
Adverse effects of infertility in cows

प्रत्येक पशुपालकाला आपल्या गोठ्यात जास्त दूध देणारी, अधिक काळ दूध देणारी गाय हवी असते. परंतु हे हव असताना तिच्या प्रजनन व्यवस्थापनाकडे मात्र आपण दुर्लक्ष करत असतो. आपल्या गोठयातील गाय प्रजननक्षम आहे हे कसे ओळखावे, तर अशा गायीने वर्षाला एक वासरू दिल पाहिजे. गंमत म्हणजे आपल्याकडील शेतकरी जोपर्यंत गायीचे दूध उत्पादन कमी होत नाही, तोपर्यंत तिला भरवून घेत नाही.

विल्यानंतर ठराविक कालावधीत गाय गाभण करणेही तितकच गरजेच आहे. वंध्यत्वाचे प्रमाण संकरीत गायीमध्ये जास्त आहे, काही ठिकाणी हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यापर्यंत वाढलेल दिसून येते. जनावरांमध्ये  वंध्यत्वासाठी (Infertility) जबाबदार घटकांमध्ये साधारणपणे चार गोष्टीना जबाबदार धरले जाते. पहिला घटक स्वतः गाय आणि दुसरा घटक तिची प्रजननसंस्था, तिसरा घटक शेतकरी (farmer) स्वतः आणि  चौथा घटक म्हणजे पशुवैदकीय अधिकारी. निदान लवकर आणि अचूक, यात अचूक होतंय पण उशिरा होतंय किंवा लवकर होतंय पण चुकीच होतय अशाने दोन वेतातील अंतर वाढते. गायी-म्हशीचे प्रजनन आरोग्य सुरळीत असणे आवश्यक आहे.

हेही पाहा- 

आपल्या गोठ्यातील जनावरे सजीव असल्यानं त्यांना रोज खाद्य देणे गरजेचे आहे. एका गायीमागे एका शेतकऱ्याचे एका दिवसाचे कमीतकमी २६० रुपये नुकसान (loss) होत असते. हा अप्रत्यक्ष खर्च आहे, हा खर्च शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. एक माज ओळखण्यात चुकल्यास २६० × ३० म्हणजेच ७ ते ८ हजार खर्च येतो.

हेही पाहा- 

पशुपालन यशस्वी करण्यासाठी दुधाचे उत्पादन जास्त हव असल्यास, तर ते फक्त एका वेतातील असून चालणार नाही. त्याच्या उत्पादनक्षम आयुष्यातील उत्पादन अधिक असणे गरजेचे आहे. आपल्याकडील गायी-म्हशीत कमीतकमी पैदास कालावधीत जास्तीत जास्त गर्भधारणा घडवून आणावी. गायीचे अधिकाधिक पैदासक्षम आयुष्य आपल्या गोठ्यात गेले पाहिजे. व्यवसायिक दृष्टीकोन समोर ठेवून पशुपालन, दुग्धव्यवसाय केले पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com