शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शिया

अगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे कमी होते. वजन कमी होते. आजाराची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना कराव्यात.
The symptoms of Alegaxia disease should be checked and immediate measures should be taken.
The symptoms of Alegaxia disease should be checked and immediate measures should be taken.

अगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे कमी होते. वजन कमी होते. आजाराची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना कराव्यात. सांसर्गिक अगॅलेक्शिया हा आजार मुख्यत: मेंढ्यांमध्ये होतो. परंतु शेळ्याही या आजारास बळी पडतात. २०२१ मध्ये महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागांत आलेली साथीमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे निश्‍चित निदान करण्यात आले. इतर भागांतही त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता पशुवैद्यकांना तसेच पशुपालकांना या विषयी माहिती असणे गरजेचे आहे. या आजारात बाधित शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे कमी होते किंवा पूर्णतः बंद होते, व्यायलेल्या मेंढ्यांच्या पिलांना दूध न मिळाल्याने वाढ खुंटते, पिले दगावतात. वजनेही कमी होतात. या आजारासाठी लागणारा उपचाराचा खर्चही जास्त असल्याने हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आजार आहे. कारणे  हा जिवाणूजन्य आजार आहे. मुख्यत्वेकरुन मायकोप्लाझमा अगॅलेक्शियामुळे होतो.मायकोप्लाझमा प्रजातीच्या इतरही काही जिवाणूंचा संबंध या आजाराशी जोडला आहे. प्रसार 

 • रोगग्रस्त मेंढ्या व शेळ्यांचे नाक, डोळ्यांतून येणारा स्त्राव, दूध, मूत्र, शेण व वीर्यातून जिवाणू शरीराबाहेर पडतात. हवा पाणी खाद्यास दूषित करतात.
 • दूषित पाणी, खाद्य आणि हवेतून हे जिवाणू तोंडाद्वारे, श्‍वसनातून आणि सडाच्या छिद्रामधून शरीरात प्रवेश झाल्यानंतर साधारणत १ ते ८ आठवड्यांच्या कालावधीत आजाराची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.
 • लक्षणे 

 • आजाराच्या सुरुवातीला चारा कमी खाणे व न खाणे, सुस्त पडणे, कळपात चालताना मागे राहणे, ताप येणे इत्यादी लक्षणे दिसतात
 • नंतर मात्र कासदाह, दूध कमी देणे किंवा न देणे, सांधे सुजणे, लंगडणे, डोळे पांढरट पडणे किंवा डोळ्यामध्ये पू होतो.
 • डोळ्यामध्ये किरॅटोंकजक्टायवाटीसमुळे आंधळेपणा येतो.
 • योग्य निदान व औषधोपचार न झाल्यास जनावर दिवसेंदिवस खंगून जाते. ते दगावण्याची शक्यता असते. कधी कधी तीव्र स्वरूपाच्या आजारात जनावर विशेष लक्षणे न दाखवता अचानक दगाऊ शकते.
 • निदान  लक्षणांवरून तसेच आजारी जनावरांपासून गोळा केलेले दूध आणि सांध्यातील पाणी या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून निश्‍चित निदान करता येते. प्रतिबंध आणि उपाययोजना 

 • आजारास प्रतिबंध करण्यासाठी लक्षणे दिसणाऱ्या मेंढ्या व शेळ्यांना ताबडतोब कळपातून वेगळे करावे.
 • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जैवसुरक्षेच्या इतर मार्गाचा अवलंब करून त्याचा पुढील प्रसार टाळावा.
 • आजाराच्या नियंत्रणासाठी लस आपल्या देशात उपलब्ध नाही, परंतु आजारी जनावरांवर योग्य औषधोपचार झाल्यास आजार बरा होतो. यासाठी आजाराच्या सुरुवातीस निदान व उपचार होणे गरजेचे आहे.
 • ऑक्सीटेट्रासायक्लिन, टायलोसीन, फ्लुरोक्विनोलोजन (इनरोफ्लोक्सासीन, सिप्रोफ्लोक्सासीन इ.) क्लिडामायसीन या प्रतिजैवकांपैकी एक तसेच ताप व वेदना कमी करण्यासाठी औषण परिणामकारक आहेत. परंतु वरील औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसारच योग्य मात्रेत व योग्य कालावधीकरिता दिल्यास फायदा होतो.
 • संपर्क : डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com