
माशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य आकाराच्या मत्स्य बीजाची गरज असते. यासाठी योग्य व्यवस्थापणातून शाश्वत मत्स्यबीज उत्पादन करावे. गोड्यापाण्यातील मत्स्य संवर्धनात कटला, रोहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सामान्य कार्प या कार्प जातीच्या माशांचे प्रामुख्याने उत्पादन केले जाते. त्यांच्या संवर्धनासाठी बोटुकली आकाराच्या बिजाची आवश्यकता असते. मत्स्य बोटुकलीचे संगोपन हे कमी कालावधीत लहान तसेच हंगामी तलावांचा वापर करुन मोठ्या प्रमाणात बीज उत्पादनासाठी प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो. कार्प जातीच्या माशांच्या बीजाचे वर्गिकरण हे मुख्यत: तीन भागामध्ये केले जाते यामध्ये मत्स्य जिरे (४-७ दिवसांचे, ५-७ मि.मी.), मत्स्य बीज (१५-२० दिवसांचे कार्प बीज, २०-२५ मि.मी.) आणि बोटुकली (२ ते ३ महिन्यांचे बीज, ८०-१०० मिमी). वयोगटानुसार, कार्प बीजांचे संगोपन दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घेतले जाते.
कार्प मत्स्य बीजाच्या संगोपनासाठी तलावांचे योग्य परिमाण
परिमाण | नर्सरी टप्पा | संगोपन टप्पा | |
मातीचा तलाव | सिमेंटची टाकी | (मातीचा तलाव) | |
तलावाचे क्षेत्र | ०.०२-०.१ हेक्टर | ५०-१०० मी२ | ०.०५-०.२ हेक्टर |
तलावाच्या पाण्याची खोली | १.०-१.५ मीटर | १.०-१.२ मीटर | १.२-१.५ मीटर |
कार्प मत्स्य बीज संगोपनाचे मुलभुत घटक साठवणपूर्व तलावाची तयारी कार्प माशांचे मत्स्य बिजाच्या साठवणुकीपूर्वी, खालील दिलेल्या पद्धतींद्वारे संगोपन तलावाची योग्य प्रकारे तयार करावी:
तलावामधील पाण्यामध्ये प्लवकांच्या (नैसर्गिक खाद्य) निर्मितीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा उपयोग
तपशीलवर माहिती | नर्सरी टप्पा | संगोपन टप्पा |
संगोपन कालावधी (दिवस) | १५-२० | ६०-९० |
भुईमूग/मोहरीच्या तेलाची पेंड (कि.ग्रा./हेक्टर) | ७५० | -- |
शेणखत (कि.ग्रॅ./हेक्टर) | २०० | १००० |
सिंगल सुपर फॉस्फेट (कि.ग्रॅ./हेक्टर) | ५० | ३०० |
युरिया (कि.ग्रॅ./हेक्टर) | - - | २०० |
खतांच्या वापराचे वेळापत्रक | मत्स्य बीज साठवण्यापूर्वी २-३ दिवस आधी वरील प्रमाणातील अर्धा भाग प्राथमिक मात्रा म्हणून उपयोग करावा. उर्वरित मात्रा २-३ भागामध्ये विभागून त्याचा वापर करावा. | बीज साठवणूकीच्या १५ दिवस आधी वरील प्रमाणातील एक तृतीयांश भाग प्राथमिक मात्रा म्हणून उपयोग करावा. उर्वरित दर पंधरवड्याच्या अंतराने प्लवकांच्या वाढीसाठी एक समान प्रमाणात वापर करावा. |
टीप : संगोपन कालावधीमध्ये शेतकऱ्याने खतांची मात्रा ही पाण्याची गुणवत्ता आणि प्लवकांचे पाण्यातील प्रमाण यानुसार कमी-जास्त करावे.
मत्स्य बीज साठवणुकी दरम्यानचे व्यवस्थापन
नर्सरी तलाव आणि संगोपन तलावातील मत्स्य बीज साठवणूक घनता
परिमाण | नर्सरी टप्पा | संगोपन टप्पा | |
मातीचा तलाव | सिमेंटची टाकी | मातीचा तलाव | |
साठवणूक घनता (प्रति हेक्टर) | ३-५ दशलक्ष मत्स्य जिरे | २०-३० दशलक्ष मत्स्य जिरे | ३-४ लाख मत्स्य बीज |
मत्स्य बीज साठवणीनंतरचे व्यवस्थापन मत्स्य बीज तलाव
पाण्याची गुणवत्ता मापदंड....................................इष्टतम प्रमाण विरघळलेला प्राणवायू .................... ५ - ८ मिलि.ग्रॅ./लि. पाण्याचा सामू (pH) ....................... ७.५ - ८.३ एकूण अल्कलिनिटी ....................... १०० - १२५ मिलि.ग्रॅ./लि. पाण्याचे तापमान ........................... २८ - ३० अंश सेल्सिअस. पाण्याची पारदर्शकता ..................... २५-३० सें.मी. प्लवकांची घनता ............................. १–१.५ मि.लि. - डॉ. अजित चौधरी, ८३२९८७९५९३ (शास्त्रज्ञ, क्षेत्रीय संशोधन केंद्र, केंद्रिय गोडेपाणी मत्स्य संवर्धन संस्था, विजयवाडा, आंध्र प्रदेश) - डॉ. सचिन खैरनार, ८१९६०१३६३९ (सह. प्राध्यापक, गुरू अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ, लुधियाना, पंजाब)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.